शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

मिसाळ यांनी स्वीकारला आयुक्तपदाचा कार्यभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2019 23:56 IST

नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची बदली झाली असून, महापालिकेच्या आयुक्तपदी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. रामास्वामी एन. यांची बदली झाली असून, महापालिकेच्या आयुक्तपदी एमआयडीसीचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुरुवारी १८ जुलै रोजी मिसाळ यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला.नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त रामास्वामी एन. यांचा निरोप समारंभ आणि मिसाळ यांचा स्वागत समारंभ महापालिका मुख्यालयात आयोजन करण्यात आले होते. या वेळी महापौर जयवंत सुतार यांनी आयुक्त रामास्वामी यांच्या माध्यमातून शहरात अनेक वेगवेगळी कामे झाली असून सभागृहात अर्थसंकल्पात मांडलेल्या बाबींची पूर्तता करण्यात आली असल्याचे सांगितले. नव्याने नियुक्त झालेले आयुक्त मिसाळ यांनी रामास्वामी एन. यांच्या माध्यमातून सुरू असलेली सर्व कामे पूर्ण करावीत, तसेच रु ग्णालये पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची जबाबदारी मिसाळ यांची राहणार असल्याचे सांगितले. मिसाळ महापालिकेच्या आयुक्तपदाचा पदभार स्वीकारताना पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी-कर्मचारी अशा सर्वांना सोबत घेऊन शहरातील नागरिकांना अभिप्रेत असलेले अधिक चांगले काम करण्याचा विश्वास व्यक्त केला.आधुनिक शहर म्हणून तसेच देशात स्वच्छतेत सातवे मानांकन असलेल्या नवी मुंबईचा नावलौकिक अधिक दर्जेदार नागरी सुविधांची पूर्तता करून वाढविण्यासाठी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्र माला महापालिकेचे पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.मिसाळ मराठवाडा कृषी विद्यापीठातून एम.एस.सी. (अ‍ॅग्रीकल्चर) व नेदरलँड हेग येथील इन्स्टिट्यूट आॅफ सोशल स्टडीजमध्ये सार्वजनिक धोरण आणि व्यवस्थापन या विषयात एम.ए. द्विपदवीधारक असणारे मिसाळ हे २00३ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस.) अधिकारी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या अनेक लोककल्याणकारी धोरण निर्मिती प्रक्रि येत त्यांनी कामगिरी केली आहे. रायगड जिल्हा परिषदेत स्वच्छता अभियानासह उल्लेखनीय नागरी सुविधा कामांमध्ये लोकाभिमुख कार्य, केले आहे.