शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
3
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
4
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
5
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
8
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
9
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
10
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
11
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
12
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
13
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
14
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
15
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
20
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले

दिघ्यात अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणारा अटकेत

By admin | Updated: January 10, 2016 00:37 IST

अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना दिघा येथे घडली आहे. एका प्रत्यक्षदर्शीमुळे थोडक्यात हा गैरप्रकार टळला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला

नवी मुंबई : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्काराचा प्रयत्न झाल्याची घटना दिघा येथे घडली आहे. एका प्रत्यक्षदर्शीमुळे थोडक्यात हा गैरप्रकार टळला. याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली असून, त्याच्याविरोधात रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.साहील अन्सारी (२२) असे पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव असून, तो दिघ्याचा राहणारा आहे. शुक्रवारी दुपारी त्याने गवतेवाडी परिसरातील एका पाच वर्षीय मुलीचे अपहरण केले होते. सदर मुलगी खेळत असताना साहील तिला पळवून घेऊन चालला होता. या मुलीसह तो डोंगराच्या पायथ्याशी एकांतात जात असल्याचे एका व्यक्तीने पाहिले. त्याने सदर प्रकार मुलीच्या घरच्यांना सांगितला. त्यानुसार मुलीच्या नातेवाइकांसह नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेतली. यावेळी साहील त्या मुलीसोबत लगट करीत असल्याचे आढळून आले. यावेळी नागरिकांनी त्याच्या तावडीतून मुलीची सुटका केली. याप्रकरणी नागरिकांनी साहील याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. त्याच्यावर रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक केली आहे. (प्रतिनिधी)