शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

सिडकोच्या सफाई कामगारांना किमान वेतन अधिनियम लागू

By admin | Updated: June 4, 2017 03:50 IST

सिडको कार्यक्षेत्रात दैनंदिन साफसफाईचे कामे करणाऱ्या सफाई कामगारांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतनश्रेणी देण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे.

- लोकमत न्यूज नेटवर्क

नवी मुंबई : सिडको कार्यक्षेत्रात दैनंदिन साफसफाईचे कामे करणाऱ्या सफाई कामगारांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतनश्रेणी देण्याचा निर्णय सिडको प्रशासनाने घेतला आहे. शुक्रवारी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत या ठरावाला मंजुरी देण्यात आली आहे. सिडकोच्या विविध क्षेत्रांत साफसफाईची कामे करणाऱ्या ११७४ कंत्राटी कामगारांना याचा लाभ होणार आहे.खारघर, कळंबोली, कामोठे, नवीन पनवेल, उलवे, द्रोणागिरी, तळोजा, नावडे तसेच काळुंद्रे या विभागांतील दैनंदिन साफसफाईच्या कामांसाठी सिडकोने कंत्राटदारांची नेमणूक केली आहे. या कंत्राटदारांच्या माध्यमातून रस्त्यांची साफसफाई, घनकचऱ्याची वाहतूक, स्मशानभूमी देखभाल व स्वच्छता, रेल्वे स्थानके आणि सिडको कार्यालयाची साफसफाई आदी कामे केली जातात. त्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी आवश्यकतेनुसार मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे. आजमितीस विविध कंत्राटदारांकडे ११७४ कामगार आणि ९ वाहनचालक कार्यरत आहेत. या सर्व कामगारांना किमान वेतन अधिनियमानुसार वेतन मिळावे, अशी कामगार संघटनांची मागणी होती. या मागणीच्या अनुषंगाने सिडकोच्या संचालक मंडळाने किमान वेतनाला मंजुरी दिली आहे. पूर्वी कर्मचाऱ्यांना मासिक १४,९६८ रुपये इतके वेतन मिळत असे. आता त्यात वाढ होऊन ते १८,८४१ रुपये इतके झाले आहे. कर्मचाऱ्यांना त्यांच्या पूर्वीच्या मासिक वेतनात ३८७३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. १ मेपासून नवीन वेतन श्रेणी लागू करण्यात आली आहे.