शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीत एमआयएमची एन्ट्री

By admin | Updated: April 28, 2017 00:38 IST

येत्या २४ मे रोजी होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीत खरी लढत शेकाप आणि भाजपात असली तरी तिसऱ्या आघाडीच्या

पनवेल : येत्या २४ मे रोजी होणाऱ्या पनवेल महापालिका निवडणुकीत खरी लढत शेकाप आणि भाजपात असली तरी तिसऱ्या आघाडीच्या माध्यमातून एमआयएमने निवडणुकीत उडी घेण्याचा निर्णय घेतला आहे. या तिसऱ्या आघाडीत एमआयएमसह अनेक छोट्या पक्षांचा समावेश आहे. खारघर सेक्टर १० याठिकाणी पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करून एमआयएमने पनवेल महानगर पालिकेच्या निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. एमआयएमचे रायगड जिल्हा प्रभारी शहनवाज खान यांच्या नेतृत्वाखाली ही निवडणूक लढविली जाणार आहे. विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवणार असल्याचे खान यांनी सांगितले. खारघर आणि पनवेलमध्ये या पक्षाच्या जाहीर सभा होणार आहेत. पनवेल महानगर पालिका हद्दीतील अल्पसंख्याक मतदारांवर एमआयएमचा डोळा असल्याचे समजते. मुस्लीम प्रबळ मतदार संघात एमआयएम जास्तीत जास्त उमेदवार उतरविण्याचे चिन्ह आहे. यामध्ये पनवेल, खारघर, तळोजामधील प्रभागांचा समावेश असणार आहे. निवडणूक लढविण्यासाठी फक्त मुस्लीम समाजाचेच नव्हे, तर बहुजन, दलित, मराठा, अनुसूचित समाजातील इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याचे रायगड जिल्हा प्रभारी हाजी शाहनवाज खान यांनी सांगितले आहे. एकूणच एमआयएमच्या माध्यमातून पनवेलच्या निवडणुकीत आता एमआयएमची एन्ट्री होणार असल्याने प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढणार आहे. (वार्ताहर)