शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

बाजरी देतेय मायेची ऊब; थंडी अन् मकर संक्रांतीमुळे वाढली मागणी, भाव नियंत्रणात

By नामदेव मोरे | Updated: January 9, 2024 13:02 IST

कोरोनापासून नागरिकांमध्ये आरोग्याची जागृती वाढली आहे

नामदेव मोरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: हिवाळा सुरू झाल्यानंतर उष्णतावर्धक खाद्यपदार्थांना मागणी वाढू लागली आहे. वाढलेली थंडी व मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बाजरीची आवक वाढू लागली आहे. सोमवारी १८५ टन आवक झाली. थंडीमुळे बाजरीच्या भाकरीला पसंती मिळत असून, भावही नियंत्रणात आल्यामुळे बाजरीच्या खरेदीत वाढ झाली आहे.

कोरोनापासून नागरिकांमध्ये आरोग्याची जागृती वाढली आहे. हंगामाप्रमाणे आहारामधील खाद्यपदार्थांमध्ये बदल केला जात आहे. हिवाळ्यामध्ये बाजरीच्या मागणीमध्ये वाढ होऊ लागली आहे. मकर संक्रांत व वाढलेली थंडी यामुळे यावर्षीही बाजरीला मागणी वाढली आहे. नियमित १० ते ३० टन बाजरीची आवक होत आहे. थंडी सुरू झाल्यापासून रोज ५० टनापेक्षा जास्त आवक होत आहे. सोमवारी सर्वाधिक १८५ टन आवक झाली आहे. राज्याच्या विविध भागांमधून व इतर राज्यांमधूनही बाजरी विक्रीसाठी येत आहे.

बाजरी खाण्याचे फायदे

बाजरीत पोटॅशियम, मॅग्नेशियम, फॉस्फरससारखे घटक असतात. रक्तदाब, कोलेस्टेरॉल, बद्धकोष्ठतेसारखे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठीही बाजरीचा उपयोग होतो. हाडांना मजबुती येते व इतरही औषधी गुण यात आहेत.मेथी वडे व सूप बनविण्यासाठीही वापर केला जातो.

 एक महिन्यापूर्वी होलसेल मार्केटमध्ये बाजरी २८ ते ४३ रुपये किलो दराने विकली जात होती.  आता हे दर २७ ते ३७ रुपयांवर आले आहेत.  किरकोळ मार्केटमध्ये ४५ ते ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. ज्वारी व गव्हापेक्षाही बाजरी स्वस्त असल्यामुळे तिला पसंती दिली जात आहे. अनेक जण बाजरीच्या भाकरीला प्राधान्य दिले जात आहे. हॉटेलमध्येही बाजरीच्या भाकरीला पसंती मिळत आहे.

कुठे पिकते बाजरी?

    महाराष्ट्रात नाशिक, धुळे, अहमदनगर, जळगाव, छत्रपती संभाजीनगर, बीड, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर येथे बाजरीचे उत्पादन होते.     देशात राजस्थान, गुजरात, हरयाणा, उत्तर प्रदेशमध्ये बाजरीचे उत्पादन होते. काही प्रमाणात आंध्र प्रदेश, कर्नाटक, मध्य प्रदेश, तामिळनाडू, पंजाबमध्येही उत्पादन घेतले जाते. 

बाजरीचा वापर- बाजरीची भाकरी, कटलेट्स, खिचडी

बाजार समिती    भाव रुपये/किलो

  • मुंबई    २७ ते ३७
  • नंदुरबार    २४ ते २५
  • नांदगाव    २६ ते २६.६०
  • चोपडा    २५ ते २५.५०
  • बीड    २४
  • पुणे    ३३ ते ३५
  • देवळा    २५ ते २६
टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई