पनवेल : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्यानिमित्त पनवेल परिसरात हजारो दुचाकी आणि शेकडो चारचाकी वाहनांची विक्र ी झाली. त्यामुळे वाहन बाजारात कोट्यवधी रु पयांची उलाढाल झाली, त्याचबरोबर आरटीओलाही चांगला महसूल प्राप्त झाला. मात्र शहराच्या आजूबाजूला सुरू असलेल्या निवासी संकुलांमध्ये घरांच्या बुकिंगमध्ये काहीशी मंदी जाणवली. सराफा बाजारात सोने खरेदी करण्याकरिता ग्राहकांनी गर्दी केली होती. अनेकांनी चारचाकी गाड्यांचे आगाऊ बुकिंग केले होते. त्या ग्राहकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर ताबा घेतला. गुरुवारी सुमारे दीड हजार दुचाकींची विक्री झाली आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दसऱ्याला नवीन वस्तूची खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे या दिवसासाठी नागरिकांसह सराफा व्यापारी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंचे शो रुम्स, मॉल्समध्येही जय्यत तयारी केली होती. पनवेलमध्ये जवळपास अडीच ते तीन कोटींची उलाढाल सराफी पेढ्यांमध्ये झाल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. एलईडी, एलसीडी, फ्रीजसह गृहोपयोगी वस्तूंची मोठ्या प्रमाणात खरेदी झाल्याचे विक्र ेत्यांनी सांगितले.
पनवेलमध्ये कोट्यवधींची उलाढाल
By admin | Updated: October 23, 2015 00:15 IST