ठाणे : लुईसवाडीत राहणाऱ्या एका ३५ वर्षीय महिलेसह तिच्या अल्पवयीन मुलीचा विनयभंग करुन गोरख जाधव याने पलायन केले आहे. वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वागळे इस्टेट साईनाथनगरातील एका ३४ वर्षीय महिलेच्या घराजवळ राहणाऱ्या गोरखने पिडीत महिलेशी शरीर संबंध असल्याचे तिच्या बहिणीच्या दीराला सांगितले. तसेच तिच्या १५ वर्षीय मुलीशीही आपले संबंध असल्याची बतावणी केली. याबाबतचा खरे खोटेपणा करण्यासाठी त्यांनी त्याला लुईसवाडीत बोलावल्यानंतर तिथेही त्याने या दोघींबद्दल अश्लील शेरेबाजी करुन ५ जानेवारी २०१५ रोजी पलायन केले. गेल्या दोन महिन्यांपासून हा प्रकार सुरु होता. अखेर याप्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध १६ फेब्रुवारी रोजी विनयभंगाचा गुन्हा त्यांनी नोंदविला आहे. महिलेस मारहाण करणारा अटकेतजलवाहिनी तोडल्याच्या संशयातून राणी उपाध्याय व त्यांच्या आईला मारहाण करणाऱ्या लक्ष्मण सौदरमल यास पोलिसांनी अटक केली आहे़ साईनाथनगर येथे राहणाऱ्या सौदरमल यांची जलवाहिनी राणी यांनीच तोडल्याचा त्यांना संशय होता. याच संशयातून १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ६ वा. च्या सुमारास तो शिवीगाळ करीत होता. तेंव्हा शिव्या का देतोस, असा जाब राणीने विचारल्यावर त्याने तिला मारहाण केली होती.
मायलेकींचा विनयभंग करुन पलायन
By admin | Updated: February 17, 2015 22:58 IST