शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

म्हसळा आयटीआयच्या इमारतीची दुरवस्था

By admin | Updated: August 12, 2016 02:28 IST

तालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची

अमोल जंगम,  म्हसळातालुक्यातील विद्यार्थ्यांना अद्ययावत व्यावसायिक शिक्षण मिळावे या हेतूने तालुक्यातील आगरवाडा येथे सुमारे ३ कोटी ५० लाख रुपये खर्च करून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेची (आयटीआय) दुमजली इमारत बांधण्यात आली. अवघ्या अडीच तीन वर्षांत या इमारतीचे बांधकाम ढासळू लागल्याने हे काम पूर्णपणे नित्कृष्ट दर्जाचे असल्याचे आता निदर्शनास येत आहे. इमारतीचे पत्रे व स्लॅब गळत असल्याने संपूर्ण इमारतीमधील भिंतींवर मोठ्या प्रमाणावर पाणी पाझरत असल्याने शेवाळ आले आहे. आयटीआयमध्ये इलेक्ट्रिशियन, इलेक्ट्रॉनिक, मेकॅनिकल अशा कोर्सेसमध्ये विद्युत उपकरणे हाताळावी लागत असल्याने पावसाळ्यात शॉक लागत असल्याने विद्यार्थी व शिक्षकांचा जीव धोक्यात आला आहे. म्हसळा तालुक्यातील आगरवाडा येथे आयटीआयची इमारत बांधण्यासाठी राज्य सरकारने ३ कोटी ५० लाख रुपये मंजूर केले. या इमारतीचे १० फेब्रुवारी २०१३ रोजी तत्कालीन पालकमंत्री आ. सुनील तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. इमारतीचे बांधकाम निकृष्ट दर्जाचे के ले आहे. अनेक ठिकाणी इमारत गळत असल्याने शेवाळ आले आहे. ठिकठिकाणी प्लास्टर, बांधकाम कोसळत आहे. खिडक्या व दरवाजे यांचे बांधकाम कमकुवत असल्याने कधी कोसळतील यांचा भरवसा नाही. स्लॅब, भिंतींना लागलेल्या गळतीमुळे वर्कशॉपमध्ये पाणी साचत असल्याने शिक्षक व विद्यार्थ्यांना जीव मुठीत घेऊन विद्युत उपकरणे हाताळावी लागत आहेत. अनेक ठिकाणी शॉक लागत आहे. गेल्यावर्षी वर्कशॉपच्या शेडचे ट्रान्सपरंट पत्रे व अन्य पत्रे फुटले होते. त्यांची दुरु स्ती करताना नवीन पत्रे नीट न लावता शेडवर ठेवून त्यावरती खडी व माती भरलेल्या पिशव्या ठेवल्या आहेत. या सर्व बाबतीत आयटीआय प्रशासनाने बांधकाम खात्याकडे किमान १२ ते १५ वेळा पत्रव्यवहार केला असून एकदाही बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दखल घेतली नसल्याची माहिती आयटीआयच्या कर्मचाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली आहे. पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.