शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

एपीएमसीच्या भाजीपाला मार्केटमध्ये मध्यरात्री पालिकेची धडक कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 01:20 IST

१३९ जणांवर कारवाई : कोरोनाविषयी नियमांचे उल्लंघन 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजीपाला मार्केटमध्ये महानगरपालिकेच्या पथकाने रात्री १२ ते पहाटे ५ दरम्यान कारवाई केली. मास्कचा वापर न करणारे व सोशल डिस्टन्सिंग नियमांचे उल्लंघन करणारांकडून ६२ हजार ३०० रुपये दंड वसूल केला आहे.                    

                            महानगरपालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी बाजार समितीमध्ये नियमांचे उल्लंघन करणारांवर कारवाई करण्याच्या सूचना प्रशासनास दिल्या आहेत. मार्केटचे कामकाज मध्यरात्री सुरू होत असल्यामुळे त्याचवेळी विशेष पथकाने नियमांचे पालन होते की नाही यावर लक्ष ठेवण्याच्या सूचना दिल्या आहेत. मनपाच्या पथकाने रात्री १२ ते शुक्रवारी पहाटे पाच दरम्यान ११५ व्यक्तींकडून मास्क न वापरल्याबद्दल ५७ हजार ५०० दंड वसूल केला आहे. सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४ व्यक्तींकडून ४ हजार ८०० दंड वसूल करण्यात आला. मनपाचे उपआयुक्त राजेश कानडे व तुर्भे विभागाचे सहाय्यक आयुक्त सुबोध ठाणेकर यांच्या नियंत्रणाखाली तुर्भे विभाग कार्यालयातील कर्मचारी व एपीएमसी मार्केट करीता नियुक्त विशेष दक्षता पथकांमधील ४८ कर्मचारी व १४ पोलीस कर्मचारी यांनी या कारवाईमध्ये सहभाग घेतला होता.कोपरखैरणेत दोन दुकानदारांवर कारवाईकोपरखैरणे विभागात सहाय्यक आयुक्त अशोक मढवी आणि विभागातील कर्मचाऱ्यांनी ब्रेक द चेन आदेशानुसार सकाळी ७ ते ११ या वेळेत जीवनावश्यक सेवेतील दुकाने कोविडच्या नियमांचे पालन करून सुरु असतील याकडे बारकाईने लक्ष दिले. यामध्ये सेक्टर १२ ई व सेक्टर ११ येथील २ दुकानांवर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी प्रत्येकी रुपये १० हजार याप्रमाणे एकूण रुपये २० हजार दंडाची रक्कम वसूल केली.