शहरं
Join us  
Trending Stories
1
खबरदार! समर्थन कराल तर १० टक्के अतिरिक्त टॅरिफ वसूल करू; डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी, कारण काय?
2
१० मिनिटांत डिलिव्हरी हाच मोठा स्कॅम! एक्सपायरी झालेले प्रॉडक्ट, तुटलेले बॅडमिंटन रॅकेट; हातात देतात आणि पळतात...
3
Palghar Rains: पालघरमध्ये आज पावसाचा रेड अलर्ट; जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी!
4
भारतीयांसाठी आनंदाची बातमी! 'युएई'ने सुरू केला विशेष व्हिसा; काय आहे संपूर्ण प्रक्रिया? जाणून घ्या
5
आणखी एक सोनम रघुवंशी! आसिफच्या प्रेमात पडलेल्या दिशानं नवऱ्याला संपवलं, बेडवरच घेतला जीव
6
FD-RD विसरून जाल, LIC ची ही 'कन्यादान' स्कीम आहे जबरदस्त; मुलीच्या लग्नाच्या वेळी मिळतील २७ लाख
7
"मराठी बोलत नाही, दम असेल तर...", भोजपुरी अभिनेत्याचं थेट राज ठाकरेंना चॅलेंज
8
ढोंगी पाकिस्तान! ज्या सैनिकाला ओळखही दाखवायला तयार नव्हते, त्यालाच दिला शहीदाचा दर्जा; आता म्हणतात... 
9
ट्रम्प ठरवणार आज शेअर बाजारात काय होणार?
10
Daily Horoscope: प्रमोशन आणि पैसा दोन्ही मिळण्याचा योग; वाचा आजचे राशीभविष्य
11
कर्मचाऱ्यांना पदोन्नतीसाठी नवी अट; डिजिटल कोर्स उत्तीर्ण होणे आवश्यक
12
महाराष्ट्रधर्म थांबलाच नाही, साखळी कधी तुटली नाही ! मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘महाराष्ट्रधर्म’ विशेष पॉडकास्टचा प्रारंभ
13
Ashadhi Ekadashi 2025: आषाढीच्या दुसर्‍या दिवशी घेतात शिळ्या विठोबाचे दर्शन; कारण...
14
रेल्वे इंजिन घसरल्याने हार्बर मार्गावर खोळंबा; पनवेलला जाणाऱ्या लाेकल साडेचार तास ठप्प
15
भारतीय तरुणांना नशेत बुडविण्याचे कारस्थान
16
मी मराठीतूनच शिकलो, मातृभाषेतून शिकल्याने विषयांची समज पक्की होते; सरन्यायाधीश भूषण गवई
17
छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा ‘सीए’त टॉपर; सीए फायनलचा निकाल जाहीर, मुंबईचा मानव शाह देशात तिसरा
18
ठाकरेंच्या एकतेमुळे मविआची एकता धोक्यात? काँग्रेसचा बदलला सूर; वेगळ्या चुलीची शक्यता
19
मतदारयाद्या पुनरावलोकनाच्या काही नियमांत सूट; बिहार निवडणूक; आता बीएलओंवर जबाबदारी
20
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...

म्हसळा, अलिबागमध्ये वाहतूककोंडी

By admin | Updated: January 30, 2017 02:14 IST

श्री क्षेत्र हरिहरेश्वर व सुवर्ण गणेश मंदिर आणि पर्यटकांसाठी म्हसळा हा दुवा आहे. म्हसळा शहराची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास

म्हसळा : श्री क्षेत्र हरिहरेश्वर व सुवर्ण गणेश मंदिर आणि पर्यटकांसाठी म्हसळा हा दुवा आहे. म्हसळा शहराची लोकसंख्या दहा हजारांपेक्षा जास्त असल्यामुळे रोजच होणाऱ्या वाहतूक कोंडीचा त्रास स्थानिक नागरिकांना होत आहे. त्याचप्रमाणे शहरात मोठी शाळा, कॉलेज असल्यामुळे शालेय विद्यार्थीही या समस्येत भरडले जातात. वारंवार होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे नागरिक संतप्त झाले असून योग्य उपाययोजनेची मागणी होत आहे.म्हसळ्यापासून अवघ्या २०-२२ किमी अंतरावर आशिया खंडातील सर्वात मोठे दिघीपोर्ट आहे. या पोर्टसाठी लागणारी अवजड यंत्रसामग्री म्हसळ्यातूनच पुढे पोर्टकडे जाते व पोर्टमधून आलेला माल म्हसळ्यातूनच मुंबई-पुण्याकडे जातो. या मार्गावरून सातत्याने सहा चाकापासून अगदी वीस चाकापर्यंतची वाहने ४० ते ४५ टनापर्यंत माल वाहतूक करतात. म्हसळ्याची बाजारपेठ मोठी असून ती अरु ंद आहे. पुरेसे वाहतूक पोलीस नसल्याने हातगाडी, रिक्षा, मिनीडोर, मोटारसायकल यावर पोलिसांचे नियंत्रण नाही. यामुळे बाजारपेठेत रिक्षा, मिनीडोर यांचे जिथे प्रवासी हात दाखवेल तिथे स्टॉप अशी परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळेही दिवसातून अनेक वेळा वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होत आहे. दिवेआगर, हरिहरेश्वर, मुरु ड, श्रीवर्धन ही पर्यटन स्थळे झाल्यामुळे दिवसेंदिवस वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामध्ये एस.टी.च्याही सुमारे दोनशे फेऱ्या दररोज होतात. बायपासचा विशेष उपयोग होत नाही, बायपास जर तोंडसुरेपासून पुढे जानसई निदवरु न पुढे सुरई आणि पुढे मुख्य रस्त्याला जोडला गेला असता तर ही समस्या भविष्यात उद्भवली नसती असे जाणकारांचे स्पष्ट मत आहे. या बायपासचा सर्व्हेही करण्यात आला होता, परंतु काही धनदांडग्यांच्या जमिनी जात होत्या म्हणून या बायपासकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे काही जुने नागरिक सांगतात.या वाहतूक कोंडीबाबत काही दिवसात उपाय केले जातील, असे आश्वासन म्हसळा पोलीस ठाण्याकडून दिले गेले होते, परंतु आजही परिस्थिती जैसे थे असल्याचे दिसून येत आहे. २६ जानेवारीपासून मधला एक शुक्र वार वगळता चौथा शनिवार व नंतर रविवार असल्यामुळे शुक्र वारची एक दिवसाची सुटी टाकून हजारो पर्यटक श्रीवर्धन-हरेश्वर-दिवेआगरला आल्यामुळे सर्वत्र हाऊसफुल्लचे बोर्ड लागलेले दिसत होते. म्हसळा हा एकमेव पर्यायी मार्ग असल्यामुळे म्हसळेकरांना सातत्याने ट्रॅफिकला सामोरे जावे लागते. अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांमुळे वाहतूक नियंत्रण करणे ही कसरत पोलिसांना करावी लागते. (वार्ताहर)अलिबागमध्ये वाहतुकीला शिस्तीची गरज1 अलिबाग : तालुक्यात वाढते शहरीकरण, पर्यटकांच्या संख्येत होणारी वाढ, बेशिस्त पार्किंग, हातगाडीवाल्यांनी गिळलेले रस्ते यामुळे अलिबाग शहरामध्ये वाहतूक कोंडीची समस्या उग्र रुप धारण करीत आहे. यावर तातडीने उपाययोजना करुन शहराला वाहतुकीची शिस्त लावण्याची गरज निर्माण झाली आहे. जिल्ह्याचे मुख्यालय येथेच असल्याने विविध सरकारी, खासगी संस्थांची कार्यालये, बँका, पतसंस्था, शाळा, महाविद्यालये येथे मोठ्या संख्येने आहेत. 2अलिबाग येथे पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. विशेष करुन वीकेएण्डला. अलिबागमधील प्रमुख रस्त्यांचे रुंदीकरण झालेले असले तरी तेथील रस्त्याच्या दुतर्फा वाहनांची पार्किंग असते. त्याचप्रमाणे अलिबाग एसटी स्टॅण्ड, स्टेट बँक आॅफ इंडिया, जुने भाजी मार्केट, जामा मशिद रस्ता, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, मारुती नाका या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी नित्याची झालेली आहे. 3अलिबाग शहरामध्ये काही ठिकाणी एक दिशा मार्ग केले आहेत. परंतु त्या नियमांचे पालन केले जात नाही. त्याचप्रमाणे वाहतूक पोलिसांसह अलिबाग नगरपरिषद हा विषय गांभीर्याने घेत नसल्याची तक्रार पत्रकारांनी रायगड जिल्ह्याचे नवीन पोलीस अधीक्षक यांच्याकडे काहीच दिवसांपूर्वी केली होती. वाहतूक समस्येवर लवकरच तोडगा काढला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते.