शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन आरटीई प्रवेश यंत्रणेचा गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 00:11 IST

आरटीई ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी पालकांना यंत्रणेतील गोंधळामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले.

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : आरटीई ऑनलाइन प्रवेशाची प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी पालकांना यंत्रणेतील गोंधळामुळे होणाऱ्या त्रासाला सामोरे जावे लागले. संकेतस्थळावर जिल्ह्यांच्या यादीतून नाशिक वगळता इतर जिल्हे गायब असल्याने पाल्याच्या नावाची नोंदणीच होऊ शकलेली नाही. तर संकेतस्थळावर मराठीतून मदतकेंद्राची नावाची पाटी कोरीच असल्याने यंत्रणेतील सावळागोंधळ उघड झाला.बालकांना शिक्षणाचा हक्क अधिनियमानुसार शासनातर्फे आरटीई २५ टक्के प्रवेशाची प्रक्रिया राबवली जाते. वंचित गटांतर्गत तसेच दुर्बल घटकातील बालकांना शिक्षण घेता यावे, याकरिता आॅनलाइन नोंदणीद्वारे त्याना मोफत प्रवेशाची संधी उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. मात्र, या संधीचा लाभ घेताना पालकांना सर्वाधिक मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे समोर येत आहे. आॅनलाइन प्रवेश प्रक्रिया राबवण्यासाठी जाहीर करण्यात आलेली दोन्ही संकेतस्थळ पालकांना गोंधळात टाकत आहेत. सन २०१९-२० च्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशाची आॅनलाइन नोंदणी प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली असून, ती २२ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे. मात्र, या प्रक्रियेच्या पहिल्याच दिवशी यंत्रणेतील गोंधळ उघड झाला आहे. प्रथमच नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या नावाची नोंदणी करण्यासाठी वास्तव्याच्या जिल्ह्याची नोंद आवश्यक आहे. मात्र, संकेतस्थळावर केवळ नाशिक जिल्हाच उपलब्ध असून, उर्वरित ३५ जिल्हे अद्याप नोंदीवर आलेले नाहीत. यामुळे पहिल्याच दिवशी पाल्याची नोंदणी करण्याचा प्रयत्न असलेल्या पालकांच्या पदरी निराशाच आली.नवी मुंबईत वास्तव्याला असलेल्या काही पालकांनी या घोळामुळे मदतकेंद्राची यादी तपासली असता, त्यामध्ये काही अधिकाऱ्यांचे नंबर चुकीचे असल्याचेही आढळून आले, तर गेल्या अनेक वर्षांपासून संकेतस्थळावर चुकीचे नंबर छापले जात असल्याने संबंधितांना त्रास सहन करावा लागत असल्याचेही उघड झाले. तर संकेतस्थळ मराठीतून उघडल्यास त्यात ठाणे जिल्ह्यातील मदतकेंद्राच्या अधिकाºयांच्या नावाची पाटी कोरीच असून, केवळ नंबर झळकत आहेत. त्यामुळे मदतीसाठी संपर्क करायचा तर कसा व कोणाला? असा प्रश्न पालकांना सतावत आहे. तर संपूर्ण राज्यासाठी असलेल्या हेल्पलाइनचा नंबरही चुकीचा असल्यानेही पालकांची गैरसोय होताना दिसत आहे.मंगळवारी सकाळपासून कोणत्याही अडथळ्याविना प्रवेश प्रक्रिया सुरू होणे पालकांना अपेक्षित असतानाही, दुपारी ४ नंतर संकेतस्थळावर प्रवेश प्रक्रिया सुरू झाली. त्यातही नोंदणीपासून ते मदतीपर्यंत अनेक त्रुटी असल्याने आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिलाच दिवस पालकांना गैरसोयीचा ठरला.