शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द

By admin | Updated: July 28, 2016 02:41 IST

निवडणुकीचा खर्च सादर न केल्याबद्दल पनवेल तालुक्यातील १०० ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील चार सदस्यांचे

पनवेल : निवडणुकीचा खर्च सादर न केल्याबद्दल पनवेल तालुक्यातील १०० ग्रामपंचायत सदस्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातून नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. त्यातील चार सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे निवडणुकीनंतर नेमून दिलेल्या मुदतीत खर्चाचा तपशील न देणाऱ्या सदस्यांना मोठा धक्का बसला आहे.आॅगस्ट २०१५ मध्ये पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक/पोटनिवडणूक घेण्यात आल्या होत्या. मात्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर खर्चाचा तपशील सादर न करणाऱ्या पनवेल तालुक्यातील १०० ग्रामपंचायत सदस्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. उमेदवारांनी नियमानुसार मतमोजणीच्या नंतर ३० दिवसांच्या आत निवडणूकखर्च सादर करणे बंधनकारक असते. तसे न केल्यास ग्रामपंचायत अधिनियमचे १९५८ चे कलम १४ ब नुसार निवडून आल्यास सदस्यत्व रद्द अथवा पाच वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास अपात्र करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यानुसार विहित कालावधी खर्च सादर न केलेल्या पनवेलमधील ४ सदस्यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. उलवे ग्रामपंचायतीमधील सुगंधा प्रकाश कोळी व रामनाथ महादेव कोळी, पिसार्वे ग्रामपंचायतीमधील संजना गोरक्षनाथ म्हात्रे, खैरवाडी ग्रामपंचायतीमधील कमळी कृष्णा सफरा यांचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. त्यानुसार यांना अपील करण्याची संधी असल्याचे तहसील विभागाकडून सांगण्यात आले आहे.खर्च सादर न केलेल्या ग्रामपंचायतीच्या सदस्यांना नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. यासाठी एक महिन्याचा अवधी देण्यात आला होता. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांनी उमेदवारांना बाजू मांडण्याची संधी दिली. मात्र, त्यांचे खुलासे समाधानकारक नसल्याने सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे. (वार्ताहर)