शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांचा सुरक्षारक्षक अभ्यास दौऱ्यात?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 23:18 IST

पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक रविवारी सिक्कीमच्या अभ्यास दौ-यावर रवाना झाले आहेत.

- वैभव गायकरपनवेल : पनवेल महानगर पालिकेचे नगरसेवक रविवारी सिक्कीमच्या अभ्यास दौ-यावर रवाना झाले आहेत. यात पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा सुरक्षा रक्षकही सहभागी झाल्याने या सुरक्षा रक्षकाचा खर्च कोणी केला, असा सवाल उपस्थित केला जात आहे.या अभ्यास दौºयासाठी पनवेल महानगर पालिकेच्या महापौर डॉ. कविता चौतमोल यांचा सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेल्या भाऊसाहेब पाटील देखील रवाना झाला असून नगरसेवकांसोबत महापौरांचा फोटो सध्या व्हायरल झाला आहे.एकीकडे पनवेल क्षेत्रात गंभीर पाणीसमस्या निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पार पडलेल्या महासभेत त्याचे पडसाद पाहावयास मिळाले. या गंभीर समस्येवर तोडगा काढण्याऐवजी नगरसेवक अभ्यास दौºयाच्या नावाखाली पिकनिकला गेले आहेत. या नगरसेवकांच्या ताफ्यात महापौरांचा सुरक्षा रक्षक भाऊसाहेब पाटील हा देखील असल्याचे व्हायरल झालेल्या छायाचित्रावरून स्पष्ट झाले आहे. विशेष म्हणजे अशाप्रकारच्या अभ्यास दौºयात सुरक्षा रक्षकांना स्थान दिले जाते का? त्याचा खर्च कोणी उचलला यावरून सध्या पालिका वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.महापौरांचे सुरक्षा रक्षक या अभ्यास दौºयात सहभागी झाल्याबाबत माहिती नसल्याचे महापालिकेचे प्रभारी नगरसचिव तिळकराज खापर्डे यांनी सांगितले. मात्र स्वखर्चाने कोणीही या अभ्यास दौºयासाठी जावू शकतो, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.>पनवेल महानगर पालिकेचे शेकापचे नगरसेवक अरविंद म्हात्रे हे देखील या दौºयावर गेले आहेत. रविवारी त्यांचा वाढदिवस असल्याने भाजपा, शेकापच्या सर्व नगरसेवकांनी गंगटोक याठिकाणी त्यांचा वाढदिवस एकत्रित साजरा केला.

टॅग्स :panvelपनवेल