शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

महापौरपदावर आज शिक्कामोर्तब, नगरसेवकांना व्हिप, उपमहापौरपदावरून काँगे्रसमध्ये मतभेद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 01:45 IST

महापौर व उपमहापौर पदासाठी ९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शिवसेनेचे विजय चौगुले यांनी अर्ज न भरल्यामुळे निवडणुकीमधील रस्सीखेच थांबली आहे.

नवी मुंबई : महापौर व उपमहापौर पदासाठी ९ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. शिवसेनेचे विजय चौगुले यांनी अर्ज न भरल्यामुळे निवडणुकीमधील रस्सीखेच थांबली आहे. प्रत्यक्ष मतदानादिवशी मते फुटू नयेत यासाठी सर्वपक्षीयांनी नगरसेवकांना व्हिप जारी केले आहेत. काँग्रेसमध्ये उपमहापौर पदावरून मतभेद सुरू असून नक्की कोण माघार घेणार की बंडखोरी कायम राहणार हे प्रत्यक्ष मतदानाच्यावेळीच स्पष्ट होणार आहे.राष्ट्रवादीकडून महापौरपद हिसकावून घेण्यासाठी शिवसेनेने अनेक महिन्यांपासून प्रयत्न सुरू केले होते. परंतु ऐनवेळी भाजपाने तटस्थ राहण्याची भूमिका घेतल्याने विजय चौगुले यांनी माघार घेतली व निवडणुकीमधील चुरस जवळपास संपुष्टात आली. मतांसाठीचा घोडेबाजारही थांबल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. तरीही सुरक्षितता म्हणून अनेक नगरसेवकांना अज्ञात स्थळी हलविण्यात आले आहे. गुरुवारी दुपारी तीन वाजता महापौर व उपमहापौरपदासाठी मतदान होणार आहे. हात वर करून मतदान करावे लागणार असल्याने मतांचे विभाजन होण्याची शक्यता धूसर झाली आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने त्यांच्या नगरसेवकांना व्हिप जारी केले असून पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.उपमहापौरपदासाठी काँगे्रसमधील मतभेद कायम आहेत. पक्षाने मंदाकिनी म्हात्रे यांना अधिकृत उमेदवारी दिली आहे. जिल्हा अध्यक्ष दशरथ भगत यांच्या पत्नी वैजयंती भगत यांनी बंडखोरी करून अर्ज दाखल केला आहे. अर्ज कोण मागे घेणार याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. पक्षाने दिलेला व्हिप दहापैकी सात नगरसेवकांनी स्वीकारला असून भगत यांच्या कुटुंबातील तीन नगरसेविकांनी व्हिप घेतला नव्हता. बुधवारी रात्री पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी दशरथ भगत यांना चर्चेसाठी बोलावले होते. उशिरापर्यंत अर्ज मागे घेतला जाणार का याविषयी काहीही अधिकृत माहिती पक्षाच्यावतीने देण्यात आली नाही.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई