शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

महापौरांनी मुख्याध्यापकाची नियमबाह्यपणे भरती केली

By admin | Updated: February 5, 2017 03:00 IST

महापौर सुधाकर सोनावणे यांनी सभापती असताना मुख्याद्यापकाची नियमबाह्यपणे भरती केली होती. आम्ही ती रद्द केली असल्याचे सुतोवाच आयुक्त तुकाराम मुंढे

नवी मुंबई : महापौर सुधाकर सोनावणे यांनी सभापती असताना मुख्याद्यापकाची नियमबाह्यपणे भरती केली होती. आम्ही ती रद्द केली असल्याचे सुतोवाच आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. आयुक्तांच्या या वक्तव्याचा महापौरांनी निषेध केला असून बदनामी केल्याबद्दल मानहानीचा दावा दाखल करण्याचा इशारा दिला आहे. नवी मुंबईचे प्रथम नागरीक महापौर सुधाकर सोनावणे व आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यामध्ये संघर्ष विकोपाला गेला आहे. महापौरांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेवून आयुक्तांवर आरोपांच्या फैरी झाडल्या होत्या. वैयक्तीक स्तरावर जावून त्रास देण्याचे काम सुरू आहे. शहरातील गरीब विद्यार्थ्यांना सुविधांपासून वंचीत ठेवले जात असून गौतमनगरमधील शाळेच्या मुख्याद्यापकाची मुद्दाम बदली करण्याचा आरोप केला होता. आयुक्तांनी हे आरोप फेटाळून लावले. मी वैयक्तीक आकसापोटी कोणतेही काम करत नाही. गौतमनगरमधील मुख्याद्यापकाची महापौर सुधाकर सोनावणे यांनी शिक्षण मंडळाचे सभापती असताना नियमबाह्यपणे नियुक्ती केली होती. त्यांनी केलेले नियमबाह्य काम आम्ही दुरूस्त केले व त्या मुख्याद्यापकाची बदली केली.आयुक्तांनी महापौरांनीच नियमबाह्य काम केल्याचे सुतोवाच केल्याने खळबळ उडाली आहे. सोनावणे यांनी या वक्तव्याचा निषेध केला आहे. गौतम नगर शाळेचे मुख्याद्यापक रमेश तेली यांची नियुक्ती मी शिक्षण मंडळाचा सभापती असताना झालेली नाही. शिक्षणमंडळावर जाण्यापुर्वीच त्यांची नियुक्ती केली होती. त्या काळामध्ये साधा सदस्यही नसताना महापौरांनी जाणीवपुर्वक बदनामी करण्याच्या उद्देशाने हे वक्तव्य केले असून त्यांच्या विरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशारा दिला आहे. (प्रतिनिधी)महापौरांची नाही पालिकेची शाळा महापौर सुधाकर सुधाकर सोनावणे यांनी त्यांच्या प्रभागातील मनपाच्या शाळा चांगल्या दर्जाची व्हावी यासाठी २० वर्ष पाठपुरावा केला आहे. येथील हिंदी व मराठी माध्यमाची शाळा खाजगी शाळेपेक्षा चांगल्या दर्जाची आहे. स्वत: सोनावणे कामकाजावर लक्ष देत असल्याने ही शाळा महापौरांची म्हणून ओळखली जाते. पत्रकारांनी महापौरांची शाळा असा उल्लेख करताच आयुक्तांनी महापौरांची नाही पालिकेची शाळा म्हणा ती त्यांची शाळा नाही असे स्पष्ट केले.