शहरं
Join us  
Trending Stories
1
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
2
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
3
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
4
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
5
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
6
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!
7
मतचोरी करूनच मोदी पंतप्रधान आणि फडणवीस मुख्यमंत्री झालेत..; काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचा आरोप
8
निवडणूक आयोगाविरोधात १ नोव्हेंबरला मुंबईत निघणार विराट मोर्चा; सर्वपक्षीय विरोधकांची घोषणा
9
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियाला पराभवाचा धक्का; ऑस्ट्रेलियानं पर्थच्या मैदानात जिंकला पहिला सामना
10
Viral Video: छोटा पॅकेट, बडा धमाका !! चिमुरडीने केला अफलातून डान्स, नेटकऱ्यांची जिंकली मनं
11
दिवाळीपूर्वी बाजारात 'लक्ष्मी दर्शन'! टॉप १० कंपन्यांच्या मार्केट कॅपमध्ये २.१६ लाख कोटींची वाढ, सर्वाधिक कुठे?
12
लव्ह ट्रँगलचा भयंकर शेवट! माजी लिव्ह-इन पार्टनरने केली गर्भवतीची हत्या, पतीने घेतला आरोपीचा जीव
13
जियोफायनान्सकडून डिजिटल गोल्ड खरेदीवर २% सोने मोफत; सोबत १० लाख रुपयांपर्यंतची बक्षिसेही
14
Mitchell Starc Bowling Speed : स्टार्कनं खरंच रोहितला 'वर्ल्ड रेकॉर्ड' सेट करणारा वेगवान चेंडू टाकला?
15
सोमवारी बँक सुरू की बंद? दिवाळीच्या दिवशी बँकेत जाण्यापूर्वी RBI ची सुट्टीची यादी नक्की तपासा!
16
IND vs AUS 1st ODI : गिलनं साधला मोठा डाव! महेंद्र सिंह धोनीचा कॅप्टन्सीतील रेकॉर्ड मोडला
17
Parineeti Chopra : परिणीती चोप्रा-राघव चड्ढा झाले आईबाबा, अभिनेत्रीच्या घरी चिमुकल्याचे आगमन
18
संतापजनक! अमृत भारत एक्स्प्रेसमध्ये वापरलेल्या प्लेट्स धुवून दिलं जेवण, प्रवाशांच्या जीवाशी खेळ
19
'द केरला स्टोरी' फेम अदा शर्माचं खरं नाव माहितीये? वेगळं नाव का वापरावं लागलं? म्हणाली...
20
IND vs AUS 1st ODI : टीम इंडियानं केल्या १३६ धावा, पण ऑस्ट्रेलियाला मिळालं १३१ धावांचं टार्गेट; कारण...

मावळ लोकसभा : बाळा भेगडेंविरुद्ध राष्ट्रवादीचे गट-तट मताधिक्यासाठी एकत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:28 IST

राष्ट्रवादीचे गट-तट एकत्र, शिवसेनेची भाजपवर भिस्त

- विशाल विकारी लोणावळा : मावळ लोकसभेच्या प्रचाराचा शेवटचा टप्पा सुरु झाला आहे. मावळ विधानसभा मतदार संघ हा सर्वसाधारण मतदार संघ आहे. या मतदार संघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची सभा वगळता इतर कोणत्याही नेत्याची सभा झालेली नाही. महायुती व महाआघाडीच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी लोकांपर्यत पोहचत उमेदवारांचे जाहीरनामे पोहचविण्याचे काम केले आहे.मावळ मतदार संघ हा दुर्गम खेडी व वाड्या वस्त्यांनी बनलेला असला, तरी यामध्ये लोणावळा व तळेगाव नगरपरिषदा, वडगाव नगरपंचायत, देहूरोड कॅन्टोमेंट बोर्ड यांचादेखील समावेश आहे. राष्ट्रवादी पक्षातील अंतर्गत गटबाजी व पाडापाडीच्या राजकारणामुळे या मतदारसंघावर मागील २५ वर्षांपासून भाजपाने पकड कायम ठेवली आहे. या वेळी मात्र पवार यांच्या नातवाला लोकसभेची उमेदवारी मिळाल्याने येथील राष्ट्रवादीचे सर्व गट-तट एकत्र आले आहेत. त्यामुळे विधानसभेची रंगीत तालीम म्हणून आमदार बाळा भेगडे यांच्याविरोधात राष्ट्रवादीला मताधिक्य देण्यासाठी स्थानिक नेते सक्रिय आहेत.मावळ विधानसभा मतदार संघ हा मावळ लोकसभा मतदार संघातील मध्यवर्ती मतदार संघ आहे. बाळा भेगडे हे मागील दहा वर्षांपासून या मतदारसंघात आमदार आहेत. मागील पाच वर्षांत या मतदारसंघातील खासदार व आमदार यांचे फारसे पटले नाही. मात्र लोकसभेच्या पूर्वसंध्येला शिवसेना व भाजपामध्ये राज्य पातळीवर हिंदुत्वाच्या मुद्द्यावर युती झाल्याने दोन्ही लोकप्रतिनिधींनी एकमेकातील वाद बाजूला ठेवत नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याकरिता प्रचार यंत्रणा राबविण्यावर जोर दिला आहे. या मतदारसंघात महायुतीच्या प्रचाराची धुरा भाजपानेच खांद्यावर घेतली असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. युतीचा घटक पक्ष असलेली रिपाइं व शिवसेनेचा नाराज गट अद्याप प्रचारात सक्रिय नाहीत. दुसरीकडे आघाडीचा घटक पक्ष असलेली काँग्रेस प्रचारात फार सक्रिय झालेली दिसत नाही.युती । प्लस पॉइंट काय आहेत?मावळ मतदार संघात भाजपाची ताकत असून, युतीची प्रचार यंत्रणा घरोघरी जात आहे. यामध्ये शिवसेना व रिपाइंचे नेतेदेखील सहभागी आहेत. मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी आरएसएसही सक्रिय आहे.युती । वीक पॉइंट काय आहेत?मावळ मतदारसंघातील प्रचाराची धुरा भाजपाकडे सोपविल्याने उमेदवाराने शिवसैनिकांवर अविश्वास दाखविला अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मावळातील काही शिवसैनिक हे प्रचारापासून आजही अलिप्त आहेत.आघाडी । प्लस पॉइंट काय आहेत?मावळ लोकसभेला पवार घराण्यातील उमेदवार असल्याने मावळातील सर्व गट अभी नही तो कभी नही या विचाराने सक्रिय झाले आहेत. या गटांना विभागवार प्रचाराची धुरा दिल्याने मताधिक्यासाठी भर देत आहेत.आघाडी । वीक पॉइंट काय आहेत?मावळ विधानसभा मतदार संघात ग्रामीण भागात राष्ट्रवादी सर्व गट-तट विसरुन प्रचार कामाला लागले असले तरी शहरी भागात प्रचार हा वर वर सुरु आहे. कॉँग्रेसदेखील प्रचारात सक्रिय होताना दिसत नाही.मागच्या निवडणुकीत़़़2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचे आमदार बाळा भेगडे ह्यांना 95 हजार 319 मते मिळाली होती तर राष्ट्रवादीचे माऊली दाभाडे यांना 67 हजार 318 मते मिळाली होती.मागच्या दोन लोकसभांमध्ये काय होता निकाल?2009मावळ लोकसभेत मावळ तालुक्यातून शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर यांना 71,196 तर आझम पानसरे यांना 56320 ऐवढी मते मिळाली होती. बसपाचे उमाकांत मिश्रा यांना 3551 मते मिळाली होती.2014 मावळ लोकसभेसाठी या मतदारसंघात शिवसेनेचे श्रीरंग बारणे यांना 89,417 तर शेकापचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांना 48,036 एवढी मते मिळाली होती. राष्ट्रवादीचे राहुल नार्वेकर यांना 31,441 मते मिळाली.कोणाच्या सभायुती । महायुतीकरिता राज्यमंत्री विजय शिवतारे व गुलाबराव पाटील यांची सभा होणार आहे.आघाडी।राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ व रोहित पवार यांच्या सभा होणार आहेत.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकMaharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019maval-pcमावळ