शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सिडको वसाहतीमधील फ्लॅटधारकांवर मावेजाचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2019 23:40 IST

कामे रखडली : वाढीव मोबदला मिळावा अशी मागणी

पनवेल : सिडको वसाहतीमधील फ्लॅटधारकांवर मावेजाचे संकट उभे राहिले आहे. परिणामी या भागातील रहिवाशांची सोसायटी स्थापने, कॉन्व्हेंस डिड, फायनल आॅर्डर, सिडको ट्रान्स्फर इत्यादी कामे रखडली आहेत. प्रकल्पग्रस्तांना दिल्या जाणाऱ्या साडेबारा टक्के विकसित भूखंडावर सिडको मावेजा आकारात असते.

मावेजा म्हणजे जागेचा वाढीव मोबदला जागेच्या मालकाला मिळावा अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. मात्र संबंधित जागेवर उभ्या राहिलेल्या ईमारती मधील फ्लॅटधारकांना या मावेजामुळे विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. संबंधित मावेजा हा बांधकाम व्यावसायिकाने भरणे अपेक्षित असतो. मात्र इमारत उभी राहिल्यावर सीसी, ओसी मिळाल्यानंतर संबंधित बांधकाम व्यावसायिक सोसायटी स्थापनेसाठी बिल्डिंग मधील रहिवाशांवर आपली जबाबदारी देत असतो. अशावेळी बिल्डरच्या माध्यमातून मावेजा कर भरला गेला नसल्याने संबंधित फ्लॅटधारकांना सोसायटी स्थापन, डिम्ड कन्व्हेंटसाठी अडचण येते.

अनेकवेळा संबंधित शेतकºयांची त्या जागेच्या वाढीव मोबदल्याची केस न्यायालयात सुरु असल्यास तो अडथळा देखील फ्लॅटधारकांना येत असल्याने यासंदर्भात काढण्याची मागणी केली जात आहे. शेतकरी, बिल्डर आणि सिडको यांच्यातील वाद असून त्याचा त्रास रहिवाशांना सहन करावा लागत आहे, फ्लॅट घेतेवेळी संबंधित बिल्डरकडून कोणतीही माहिती फ्लॅटधारकांना देण्यात येत नसून अनेक बिल्डरांनी फसवणूक केल्याच्या घटना उघडकीस आल्याची माहिती पनवेल सिडको हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष कुंडलिक काटकर यांनी दिली.

यासंदर्भात १५ डिसेंबर रोजी करंजाडे येथे सभा आयोजित करण्यात आली होती. त्यात कुंडलिक काटकर यांनी या विषयवार फ्लॅटधारकांना मार्गदर्शन करीत मावेजाचा ज्वलंत प्रश्न सोडविण्याकरिता सिडको विरोधात लढा उभारण्यास सांगितले.पत्रव्यवहार करूनही सिडकोकडून प्रतिसाद नाहीव्यवस्थापकीय संचालक यांना याप्रकरणी तीन वेळा पत्रव्यवहार करून देखील त्यांच्याकडून पत्राचे उत्तर देखील देण्यात आले नाही. सिडकोच्या उदासीन कारभारामुळे एक एक पैसे गोळा करून घर घेतलेल्या सर्वसामान्य फ्लॅटधारकांची हि पिळवणूक सुरु आहे. ती कुठे तरी थांबायची गरज असल्याचे मत पनवेल सिडको हौसिंग फेडरेशनचे अध्यक्ष काटकर यांनी व्यक्त केले.