शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानची मिनी ट्रेन तोट्यात?

By admin | Updated: November 17, 2016 05:02 IST

नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे ८ मे, २०१६ रोजी नॅरोगेज रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेने मिनीट्रेनची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद केली आहे.

कांता हाबळे

नेरळ : नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे प्रवासी डब्बे ८ मे, २०१६ रोजी नॅरोगेज रुळावरून घसरल्यानंतर रेल्वेने मिनीट्रेनची वाहतूक अनिश्चित काळासाठी बंद केली आहे. सहा महिने उलटूनही ही वाहतूक पुन्हा सुरू झालेली नाही. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे विचारणा केली असता, मिनीट्रेन तोट्यात असल्याचे कारण देण्यात येत आहे. मात्र, दरवर्षी जवळपास अडीच लाख प्रवाशांची वाहतूक करणारी मिनीट्रेन तोट्यात कशी, असा प्रश्न स्थानिकांना पडला आहे. ही सेवा पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरते आहे. गेल्या चार वर्षांत मिनीट्रेन आणि शटल सेवेतील प्रवाशांची संख्या अडीच-तीन लाखांवर पोहोचली आहे. नेरळ-माथेरान मार्गावरील प्रवासी वाहतूक यातून मिळालेले उत्पन्न दरवर्षी जवळपास सव्वादोन ते अडीच कोटींच्या घरात आहे. नेरळ-माथेरान या २० कि.मी.च्या घाटमार्गावर मिनीट्रेन चालवली जाते. १९०७ मध्ये ब्रिटिश राजवट असताना सुरू झालेली मिनीट्रेन जागतिक वारसासाठी प्रस्तावित आहे. जागोजागी वळणे, अरुंद मार्गाचा अभ्यास करण्यासाठी जगभरातून पर्यटक आणि अभ्यासक याठिकाणी नेहमीच येत असतात. मिनिट्रेन सुरू झाल्यापासून पावसाळ्यात ती बंद ठेवण्याचा पायंडा आजतागायत कायम आहे. २९ सप्टेंबर, २०१२मध्ये मिनीट्रेनची शटल सेवा सुरू केल्यानंतर पावसाळ्यात अमन लॉज -माथेरान या शटल सेवेला पर्यटक तसेच स्थानिक प्रवाशांचा उदंड प्रतिसाद मिळतो. माथेरानमधील विद्यार्थी, तसेच नोकरदार वर्ग, स्थानिकांनाही शटल सेवा सोयीची पडते. ९ मे २०१६ पासून हा मार्ग बंद करण्यात आला. मात्र, आता मार्ग तोट्यात असल्याचे कारण पुढे करण्यात येत आहे. पाच वर्षांचा विचार करता, मिनीट्रेनमधून दरवर्षी साधारण २ लाखांहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. शिवाय या मार्गाची लोकप्रियता अफाट आहे. असे असताना आणि चांगले उत्पन्न असतानाही ही रेल्वे बंद ठेवण्यात कोणाचा, कसा व काय फायदा आहे? असा प्रश्न निर्माण होत आहे.