शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा एकदा बोलले पाकिस्तानची भाषा, म्हणे "पाच विमाने पाडली, हे युद्ध मीच थांबविले"
2
आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
3
केमोथेरपीमुळे कॅन्सर आणखी बळावण्याची भीती?; चिनी संशोधकांचा धक्कादायक स्टडी रिपोर्ट
4
चीन तिबेटमध्ये बांधतोय जगातील सर्वांत मोठे धरण; भारत-चीन सीमेजवळ असणार प्रकल्प
5
लक्षात ठेवा, मी सांगतो तेच काम आणि कामाशिवाय दाम; विधिमंडळातील राड्यावर जनता नाराज
6
नोकरी सोडताना कर्मचाऱ्याचा केलेला अपमान कंपनीला पडला महागात; कोर्टाने ठोठावला दंड
7
त्या खासदार झाल्या, पण छळ काही थांबला नाही...; इंटर पार्लियामेंटरी युनियनचा धक्कादायक अहवाल
8
राज ठाकरेंना मी हिंदी शिकवली; निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचले 
9
दोन मुख्यमंत्र्यांना अटक करणाऱ्या ईडी अधिकाऱ्याने अचानक दिला राजीनामा! सेवेला १५ वर्षे शिल्लक अन् कपिल राज झाले निवृत्त
10
धक्कादायक..! छत्रपती संभाजीनगरमध्ये एकाच कुटुंबातील ३ बालकांना अचानक लुळेपणा, अशक्तपणा
11
शिखर बँक देणार सोसायट्यांना कर्ज, शेतकऱ्यांना माेठा दिलासा! सावकारी जाचातून बळीराजाची सुटका करण्यासाठी निर्णय
12
ताक प्या आणि मस्त राहा! पण ताकासाठी दही कसं निवडावं? हेही जाणून घ्या
13
देशातील टीव्हींचे ८० टक्के सुटे भाग चीनमधून येतात, ‘मेक इन इंडिया’त फक्त  ‘जोडाजोडी’ : राहुल गांधी
14
हनी ट्रॅप प्रकरण तपासासाठी पथक नाशकात, ‘त्या’ हॉटेलची झाडाझडती घेतल्याचे वृत्त; जळगाव प्रकरणीही एक अटकेत
15
‘इंडिया’ आघाडी सरकारला आठ मुद्द्यांवर घेरणार! अधिवेशनापूर्वी घटक पक्षांची व्हर्च्युअल बैठक
16
...तर तुम्हा-आम्हाला स्वस्त वीज मिळेल! खासगी कंपन्यांच्या प्रवेशाने महाराष्ट्राच्या वीज बाजारात स्पर्धा वाढणार
17
तीन व्यक्तींच्या डीएनएद्वारे आठ मुले कशी जन्माला आली? ब्रिटनमध्ये आगळावेगळा प्रयोग
18
७ राज्यांत पेच; भाजपच्या अध्यक्ष निवडीला विलंब, २९ राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका झाल्या पूर्ण!
19
सरकारी कार्यालयांच्या वेळा वेगवेगळ्या; मुंबईत गर्दी कमी करण्यासाठी नवीन उपाय!
20
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?

माथेरानमध्ये हातरिक्षांचे मजूर दाखल

By admin | Updated: April 26, 2017 00:12 IST

केवळ आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी अनेक भागांतून, जिल्ह्यातून इथे मोलमजुरी करण्यासाठी मजूर वर्ग येत असतो.

मुकुंद रांजणे / माथेरानकेवळ आपल्या कुटुंबाचा चरितार्थ भागविण्यासाठी अनेक भागांतून, जिल्ह्यातून इथे मोलमजुरी करण्यासाठी मजूर वर्ग येत असतो. येथे भले कंपन्या, कारखाने नाहीत, परंतु अतिकष्टदायक कामे करून वेळप्रसंगी पोटाला चिमटा घेऊन आपल्या कुटुंबासाठी रिक्षा ओढण्यासाठी झटणारे कष्टकरी मजूर येथे पहावयास मिळतात. अनेकजण हे हातरिक्षा तसेच सामानाची हातगाडी ओढणे हीच कामे करताना दिसत आहेत. मुळातच हा सर्वच मजूर वर्ग यवतमाळ, नांदेड व अन्य भागांतून नियमितपणे येतो. नुकताच वर्षातील अखेरचा पर्यटनाचा सुट्यांचा हंगाम मे महिना असल्याने हे मजूर येथे दाखल झाले आहेत. माथेरानमध्ये एकूण ९४ हातरिक्षा असून प्रत्येक हातरिक्षा ओढण्यासाठी तीन मजुरांची आवश्यकता असते.प्रत्येक भाड्यामागे एक चतुर्थांश हिस्सा हातरिक्षा मालकाला द्यावा लागतो तर उर्वरित तीन हिस्से हे मजूर समान विभागून घेतात. घोड्यापेक्षा हातरिक्षांच्या दरात फक्त काहीअंशी फरक आहे, तर घोडेवाले सुद्धा या गाडीच्या भाड्याएवढे पैसे पर्यटकांकडून घेताना दिसतात. मेहनत जरी या गाडीवाल्यांची अधिक असली तरीसुद्धा प्रवाशांचे भाडे मिळविण्यासाठी या गाडीवाल्यांना दस्तुरी नाक्यावर तारेवरची कसरत करावी लागत आहे. या गाडीत एका पर्यटकासोबत एक बॅग आणि लहान मूल बसविले जाते, परंतु या हातरिक्षात सामान घ्यायचे नाही फक्त पॅसेंजरलाच बसवावे अशीच दादागिरी सुद्धा दस्तुरी नाक्यावर नेहमीच पहावयास मिळते. त्यामुळे या प्रवासाचा नाहक भुर्दंड सामान वाहून नेण्यासाठी अन्य हमाल करून प्रवाशांना सोसावा लागत आहे. दस्तुरी नाक्यावर शासनाने ठरविलेले दरपत्रक नाहीत.त्यामुळे अव्वाच्यासव्वा रक्कम उकळली जात आहे. जेवढी रक्कम मुंबईपासून नेरळपर्यंत येण्यास खर्च होत नाही तेवढी रक्कम केवळ दस्तुरी ते गावात येण्यासाठी (तीन कि.मी.साठी ) खर्च होत आहे. काही घोडेवाले अधिक दर आकारताना दिसतात.जवळपासचे दोन ते चार पॉइंट दाखवून पुन्हा दस्तुरीला सोडण्यासाठी काही जण पंधराशे ते दोन हजार रुपये घेत आहेत. तसेच गावातून दस्तुरीला जावयाचे असल्यास प्रवाशांना अमनलॉज या रेल्वे स्टेशनला उतरविण्यात येते. भाड्याचे सगळे पैसे घेऊन प्रवाशांना पुढील पायपीट करण्यास भाग पाडले जात आहे.