शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

माथेरानकरांनी मांडले गाऱ्हाणे

By admin | Updated: March 28, 2017 05:27 IST

गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या २६ मार्चला रविवारी माथेरानला आल्या होत्या. त्या दस्तुरी नाका येथील

माथेरान : गुजरातच्या माजी मुख्यमंत्री आनंदीबेन पटेल या २६ मार्चला रविवारी माथेरानला आल्या होत्या. त्या दस्तुरी नाका येथील टॅक्सी स्टॅण्डहून गावात येताना हातरिक्षात बसून आल्या. माणूस माणसाला ओढणाऱ्या या अमानवीय प्रथेबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली, तसेच दगडमातीच्या खड्ड्यातील रस्त्यांबद्दल सुद्धा उपरोधिक टोला लगावला. गुजरातच्या आदिवासी पाड्यांमध्ये यापेक्षा उत्तम दर्जाचे रस्ते आहेत. देश आधुनिकतेच्या बाबतीत तंत्रज्ञानात अग्रेसर असताना येथे आजही मानवचलित हातरिक्षा पाहून आपण आजही ब्रिटिश राजवटीत असल्याचा आभास होत आहे. येथे केवळ ई-रिक्षा हाच एकमेव आणि सोयीस्कर उत्तम पर्याय ठरू शकत असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. याबाबतीत आपण स्वत: केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना शिफारस करणार असल्याचे सांगितले.या वेळी भाजपाचे माथेरानचे शहर अध्यक्ष विलास पाटील, संजय भोसले, अरविंद शेलार यांनी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलेल्या मिनीट्रेनसंदर्भात तसेच पर्यायी मार्ग म्हणून पनवेल-धोदाणी मार्गे माथेरान घाट रस्त्याबाबत आणि प्रामुख्याने वाहतुकीसाठी ई-रिक्षा सुरू व्हावी अशा आशयाचे निवेदन आनंदीबेन पटेल यांना दिले. या वेळी गुजराती समाजाचे दीपक शहा, इंद्रवर्धन शहा, जेसुभाई, मुकेश शहा, नितीन शहा, गिरीश चोथाणी आदींनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. यावर लवकर काहीतरी ठोस उपाययोजना करून येथील मूलभूत समस्या तडीस नेण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू. त्यातच पहिल्यांदा येथील अमानवीय प्रथा असलेली हातरिक्षा बंद करून ई -रिक्षासाठी संबंधित खात्याशी तसेच मंत्र्यांशी संपर्क करणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वार्ताहर)