शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्ववत सुरू ठेवा

By admin | Updated: May 13, 2016 02:39 IST

माथेरान येथील ब्रिटिशकाळापासून असलेल्या व पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन रेल्वे सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

नेरळ : माथेरान येथील ब्रिटिशकाळापासून असलेल्या व पर्यटकांचे खास आकर्षण असलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेन रेल्वे सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ही मिनीट्रेनची सेवा पूर्ववत चालू ठेवण्यासाठी खासदार श्रीरंग बारणे यांनी बुधवारी (११ मे) संसदेत प्रश्न उपस्थित केला व रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची प्रत्यक्ष भेट घेवून चर्चाही केली. यावेळी माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्वपदावर येण्यासंदर्भात रेल्वे मंत्र्यांना निवेदन दिले.नेरळ - माथेरान या मार्गावर ब्रिटिशांनी पुणे व मुंबई शहराच्या मध्यवर्ती असलेल्या माथेरानला त्यावेळी थंड हवेचे ठिकाण घोषित करून पर्यटन क्षेत्र म्हणून विकास करण्यात आला. ही मिनीट्रेन सेवा सुरू झाली त्याला आज ११० वर्षे पूर्ण झाली आहेत. येथे भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने खऱ्या अर्थाने माथेरान हे प्रकाशझोतात आले आहे. एखादी अपवादात्मक घटना वगळता या मिनी ट्रेनची सेवा अखंड चालू आहे. परंतु मागील दोन वर्षापासून या गाडीच्या सेवेला ग्रहण लागले आहे. अमन लॉज रेल्वे स्थानकाजवळील भागात एकाच आठवड्यात ही मिनीट्रेन दोन वेळा रुळावरून घसरल्यामुळे ही सेवा अनिश्चित काळापर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सूत्रांकडून समजते. माथेरानचे प्रमुख आकर्षण ही छोटी टॉयट्रेन आहे. देश-विदेशातून पर्यटक खास करून याच सफरीत रममाण होण्यासाठी नियमितपणे येत असतात. मुंबईच्या लोकलप्रमाणेच माथेरानकरांच्या उदरनिर्वाहाची ही लाइफलाइन बनली आहे. माथेरानच्या विकासाच्या दृष्टिकोनातून ही महत्त्वपूर्ण बाब असून ही मिनी ट्रेन पूर्ववत सुरू ठेवावी असा मुद्दा खासदार श्रीरंग बारणे यांनी संसदेत उपस्थित केला व त्याचबरोबर रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेऊन ही मिनीट्रेन सुरू ठेवावी याबाबतचे निवेदन दिले आहे. यावेळी माथेरान शिवसेना शहर प्रमुख चंद्रकांत चौधरी व संपर्क प्रमुख प्रसाद सावंत, कैलाश चौधरी आदींनी यावेळी माथेरान मिनीट्रेन सेवा पूर्वपदावर येण्यासंदर्भात रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांना निवेदन दिले. (वार्ताहर)