शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-यांना माथाडींचा मदतीचा हात, मुख्यमंत्र्यांनी केले कष्टकरी कामगारांचे कौतुक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2017 03:01 IST

राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांना माथाडी कामगारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.

नवी मुंबई : राज्यातील संकटग्रस्त शेतक-यांना माथाडी कामगारांनी मदतीचा हात पुढे केला आहे. ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला. एका दिवसाचे वेतन शेतकºयांसाठी दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कामगारांचे स्वागत केले असून, ही कृती इतरांसाठी प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार काढले आहेत.राज्यातील असंघटित हमाल व कष्टकरी कामगारांना एकत्र आणून त्यांच्यासाठी कायदा बनविण्यास सरकारला भाग पाडण्यामध्ये महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनची महत्त्वाची भूमिका आहे. अण्णासाहेब पाटील यांनी राज्यातील माथाडी कामगारांना त्यांचे हक्क मिळवून दिले. कामगारांना घरे व उपचारासाठी स्वत:चे रुग्णालय सुरू करण्यात आले. राज्यातील माथाडी कामगारांनीही त्यांना मिळालेल्या कष्टाच्या मोबदल्यातील काही वाटा संकटग्रस्तांना देण्याची परंपरा कायम राखली आहे. राज्यात भूकंप, अतिवृष्टी, दुष्काळ व इतर कोणतेही नैसर्गिक संकट असले की, सर्वात प्रथम धावून जातो तो माथाडी कामगारच. मुंबईतील १९९३मधील बॉम्बस्फोटानंतर सर्वप्रथम जनजीवन सुरळीत करण्यामध्येही माथाडी कामगारांचा मोठा वाटा होता. तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांनीही माथाडींमुळेच दुसºया दिवशी जनजीवन सुरळीत झाल्याचे अनेक वेळा भाषणांमध्ये सांगितले आहे. कामगारांनी पुन्हा एकदा राज्यातील शेतकºयांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. दुष्काळ, अतिवृष्टीमुळे संकटात असलेल्या शेतकºयांना मदत करता यावी, यासाठी कामगारांनी एक दिवसाचे वेतन दिले आहे. ३० लाख रुपयांचा निधी बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सुपूर्द केला.माथाडी कामगारांनी केलेल्या मदतीचे मुख्यमंत्र्यांनीही कौतुक केले आहे. कष्टकरी कामगारांनी त्यांचे एका दिवसाचे वेतन शेतकºयांसाठी देणे ही इतरांसाठी प्रेरणादायी गोष्ट आहे. अशाप्रकारे प्रत्येक नागरिकाने मदतीचा हात पुढे केला, तर प्रत्येक संकटग्रस्तांना आधार देणे सहज शक्य असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.माथाडी नेत्यांनीही कामगारांनी आतापर्यंत सामाजिक जाणिवेमधून काय केले, याविषयी माहिती दिली. माथाडी कामगारही शेतकरीच असून, बहुतांश कामगार शेती व्यवसायाशी संबंधित उद्योगामध्ये कार्यरत आहेत. यामुळेच शेतकºयांच्या मदतीसाठी कामगार नेहमीच पुढे येत असल्याचे सांगितले.या वेळी माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार नरेंद्र पाटील, गुलाबराव जगताप, एकनाथ जाधव, गुंगा पाटील, पोपटराव देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.>कामगारांना २५०० घरांचे आश्वासनमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षभरामध्ये माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. वडाळा येथील गृहप्रकल्प पूर्ण होण्यामधील अनेक अडथळे दूर केले आहेत. याशिवाय अजून २५०० घरे उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. वडाळामधील गृहप्रकल्पांसाठी जादा चटईक्षेत्र देता येईल का, याविषयी चाचपणी करण्यात येणार आहे. कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सरकार कटिबद्ध असून, शक्य तितक्या लवकर घरांसह सर्व प्रश्न सोडविण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी या वेळी दिले असल्याने कामगारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले.माथाडी कामगारांनी राज्यातील प्रत्येक नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीचा हात पुढे केला आहे. शेतकºयांसाठी एका दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. कामगारांनी दिलेला ३० लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आला.- नरेंद्र पाटील,माथाडी नेते