शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

प्रलंबित प्रश्नांसाठी माथाडी कामगार आक्रमक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2020 00:25 IST

२६ फेब्रुवारीला लाक्षणिक संप; १८ प्रश्न सोडविण्याची शासनाकडे मागणी

नवी मुंबई : प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपविण्याचे कारस्थान सुरू आहे. कामगारांचे प्रश्न वर्षानुवर्षे सोडविले जात नाहीत. प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने आक्रमक भूमिका घेतली आहे. १८ समस्यांचे निवेदन शासनाला दिले असून, हे प्रश्न मार्गी लावावेत यासाठी २६ फेब्रुवारीला लाक्षणिक संप करण्यात येणार आहे.कामगारांच्या समस्यांविषयी माहिती देण्यासाठी महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे सरचिटणीस नरेंद्र पाटील व कार्याध्यक्ष माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. माथाडींचे प्रश्न गंभीर होत चालले आहेत. माथाडी बोर्डांवर पूर्णवेळ अध्यक्ष नाहीत. कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. वर्षानुवर्षे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. आकसबुद्धीने माथाडी हॉस्पिटलची चौकशी लावण्यात आली होती. त्या समितीचा निर्णय अद्याप आलेला नाही. सर्व प्रश्न सोडविण्यासाठी वारंवार पाठपुरावा करूनही काहीच होत नसल्याने आंदोलन करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.शशिकांत शिंदे यांनीही प्रशासकीय स्तरावर माथाडी कायदा संपविण्याचे षड्यंत्र सुरू असल्याचे स्पष्ट केले. कामगारांच्या अस्तित्वाला धक्का लागणार असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही. कामगारांच्या हितासाठी आंदोलन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.माथाडी संघटनेने १८ प्रमुख मागण्यांचे निवेदन शासनाला दिले आहे. हे सर्व प्रश्न तत्काळ सोडविण्यात यावेत. प्रश्न न सोडविल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे. पत्रकार परिषदेच्या वेळी चंद्रकांत पाटील, पोपटराव देशमुख व इतर पदाधिकारी उपस्थित होते.कामगारांचे प्रलंबित प्रश्न पुढीलप्रमाणेबोर्डातील एएसटीआय कंपनीच्या संगणक प्रणालीद्वारे देण्यात येणारी सेवा खंडित केल्याविषयी निर्णय व्हावामाथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे, समितीवर युनियनच्या पदाधिकाऱ्यांची नेमणूक करणेविविध माथाडी बोर्डांची पुनर्रचना करणे व युनियनच्या सदस्यसंख्येच्या प्रमाणात सदस्यांची नेमणूक करणेमाथाडी मंडळातील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देणेमंडळामध्ये अध्यक्ष व सचिवांच्या नेमणुका करणेमाथाडी पतसंस्थांमधून कर्जाचे हप्ते कपात न करण्याच्या निर्णय रद्द घेणेकळंबोली स्टील मार्केटमध्ये सुविधा उपलब्ध करून देणेफॅक्टरीमध्ये माथाडी कायदा व मंडळाच्या योजनेची अंमलबजावणी करणेविविध रेल्वे यार्डांत माथाडी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून देणेमाथाडी कायदा व मंडळाच्या योजनेतील त्रुटी दूर करणेमाथाडी हॉस्पिटलच्या चौकशीचे गुºहाळ थांबवून रुग्णालय सुरळीत सुरू करण्यास सहकार्य करावेकोल्हापूर माथाडी मंडळातील कामगारांच्या प्रश्नांसंदर्भात निर्णय घेणेपुणे येथील कामगारांचे प्रश्न सोडवणेमाथाडी कायद्यात पोलीस संरक्षणाची तरतूद करणे, गुंड प्रवृत्तीला आळा घालण्यासाठी समिती गठीत करणेनाशिक येथील माथाडी बोर्डातील कामगारांच्या लेव्हीच्या प्रश्नाची सोडवणूक करणेबाजार समितीच्या मापाडी व तोलणार कर्मचाºयांना बाजार समितीच्या सेवेत सामावून घेणेवडाळा येथील माथाडी कामगारांच्या घरकुलातील अडचणी दूर करणेनवी मुंबई परिसरात घरे उपलब्ध करून देणे व इतर प्रश्न सोडविणेआरपारची लढाईमाथाडी कायद्याच्या व कामगारांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कामगारांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आरपारची लढाई सुरू करण्यात येत असल्याची माहिती संघटनेच्या पदाधिकाºयांनी दिली.