शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

माथाडी कायदा कोणत्याही परिस्थितीमध्ये रद्द होणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

By नामदेव मोरे | Updated: September 25, 2023 16:27 IST

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमीत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजीत कामगार मेळाव्यात देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते.

नवी मुंबई : माथाडी कायद्याशी छेडछाड केली जाणार नाही. कोणत्याही परिस्थितिमध्ये कायदा रद्द होणार नाही. सर्वांना विश्वासात घेऊन काळानुसार आवश्यक ते बदल केले जातील. कायद्याचा दुरूपयोग करणारांची संख्या वाढत असून त्यांना जेरबंद करण्याचा इशाराही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे.

महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनीयनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ९० व्या जयंतीनिमीत्त मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आयोजीत कामगार मेळाव्यात देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करत होते. हा मेळावा माथाडी कामगारांचे प्रश्न सोडविण्याचे व्यासपीठ आहे. राज्यातील माथाडी कायद्याला पन्नास वर्ष झाली आहेत. काळानुसार त्यामध्ये आवश्यक ते बदल केले जातील. माथाडी कायद्याच्या आडून खंडणी मागणारांची, गुंडगिरी करणारांची संख्या वाढत आहे. कायदा बदनाम करणाऱ्या खंडणीखोरांना जेरबंद करण्यात येईल. कायद्यातून पळवाटा शोधून त्याचा दुरूपयोग करणारांना अटकाव करण्यासाठी काही बदल आवश्यक असून ते सर्वांना विश्वासात घेऊन केले जातील असे आश्वासनही त्यांनी दिले.

माथाडी कामगारांना सिडकोच्या योजनेमध्ये घरे देण्याबरोबर नाशिकमधील कामगारांच्या लेव्हीचा प्रश्न सोडविला जाईल. अण्णासाहेब पाटील यांनी कामगारांबरोबर मराठा समाजाच्या हक्कासाठीही लढा दिला. मराठा समाजाचे आरक्षण व इतर प्रश्न सोडविण्यास सरकार कठीबद्द आहे. कायद्याच्या चौकटीत राहून समाजाला न्याय देण्याचे काम केले जाईल. सारथी व अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून समाजातील तरूणांना न्याय देण्याचे काम केले जाईल असेही त्यांनी सांगितले.

फेक कामगारांमुळे उद्योग राज्याबाहेरराज्यातील कारखान्यांमध्ये माथाडी कायद्याचा दुरूपयोग करणारांची संख्या वाढत आहे. फेक संघटना व कामगार खंडणी गोळा करत आहेत. त्यांच्यामुळे स्टील व इतर उद्योग राज्याबाहेर जात असल्यामुळे माथाडी कायद्याचा दुरूपयोग करणारांवर कडक कारवाई करण्याचा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

कामगार मंत्र्यांविरोधात आंदोलनाचा इशारामाथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी कामगार मंत्री सुरेश खाडे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त केली. माथाडी कायद्याचे अस्तीत्व संपूष्टात आण्याचे प्रयत्न सुरू आहेत. कामगारांचे प्रश्न सोडविले जात नाहीत. कामगारांच्या हितासाठी त्यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा पाटील यांनी यावेळी दिला.

नाशिकमधील कामगारांचा १३५ कोटीचा प्रश्नआमदार शशिकांत शिंदे यांनी माथाडी कामगारांना वाशी व जुईनगरमध्ये सिडकोच्या प्रकल्पात घरे देण्याची मागणी केली. माथाडी कायदा बळकट करण्याची मागणी केली. नाशिकमधील कामगारांना लेव्हीचे १३५ कोटी रूपये देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. पण व्यापारी कामगारांची देणी देत नसून सरकारने त्यासाठी सहकार्य करण्याची मागणीही शिंदे यांनी केली.

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबई