शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एमआयडीसीमधील कंपनीला भीषण आग; जीवितहानी हानी, पाच तासांनी आग आली आटोक्यात 

By सूर्यकांत वाघमारे | Updated: January 4, 2024 19:22 IST

पावणे एमआयडीसी मधील मेहक या कंपनीत आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली.

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : पावणे एमआयडीसी मधील मेहक या कंपनीत आग लागल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. कंपनीत काम सुरु असताना हि दुर्घटना घडली असून आगीचे नेमके कारण स्पष्ट झाले नाही. तर आगीमुळे ड्रमचे स्फोट होऊन त्यामधील केमिकल रस्त्याने वाहत नाल्यात गेले असता ते देखील पेटल्याने नाल्यातही आग पसरली होती. एका कंपनीचे नुकसान झाले आहे. 

गुरुवारी सकाळी साडेसातच्या सुमारास मेहक कंपनीत आग लागली. आगीची माहिती मिळताच एमआयडीसी तसेच महापालिकेच्या अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी दाखल झाले होते. अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या या कंपनीचा प्रकल्प सलग तीन भूखंडावर पसरलेला आहे. तर कंपनीला लागूनच इतरही काही रासायनिक कंपन्या आहेत. यामुळे परिसराला आगीचा धोका निर्माण झाला होता. त्यातच आगीमध्ये उडणारा भडका व रस्त्यावरून नाल्यात वाहणारे केमिकलचे पाट यांनी देखील पेट घेतला होता.

त्यामुळे नाल्यातल्या झाडांनी देखील पेट घेऊन धुराचे लोट निघत होते. तुर्भे एमआयडीसी पोलिसांनीही त्याठिकाणी धाव घेऊन परिसरातील कंपन्यांमधील कामगारांना सुरक्षित ठिकाणी हलवले. अखेर फोमचा मारा करून अग्निशमन दलाला आगीवर नियंत्रण मिळवावे लागले. त्यामध्ये सुमारे पाच तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आली. यामध्ये कोणालाही गंभीर दुखापत झाली नसून आगीच्या कारणाचा तपास सुरु असल्याचे एमआयडीसी अग्निशमन केंद्र अधिकारी संतोष पाटील यांनी सांगितले.