शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बाजार समितीच्या फळ मार्केटला संचारबंदीचा विसर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2021 00:35 IST

मध्यरात्रीपर्यंत कँटीन सुरू : मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप; मुक्त संचारामुळे कोरोना वाढतोय

नामदेव मोरेलोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये संचारबंदीमधील एकाही नियमाचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. रात्री दहा वाजल्यानंतरही येथील कँटीन सुरू असतात. काही स्टॉल्सही अनधिकृतपणे सुरू ठेवले जात आहेत. मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले असून मुक्कामी असणारे रोजंदारीवरील कामगार एका जागेवर गर्दी करून गप्पा मारत बसलेले असतात. नियम धाब्यावर बसल्यामुळे मार्केटमध्ये व शहरातही कोरोनाचा प्रसार वाढत आहे.

नवी मुंबईमधील सर्व हॉटेल व कँटीन रात्री आठनंतर बंद असतात. परंतु बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये मध्यरात्रीपर्यंत कँटीन सुरू ठेवली जात आहेत. शहरातील सर्व हॉटेलमधून फक्त पार्सलला परवानगी देण्यात आली आहे. परंतु फळ मार्केटमधील कँटीनमध्ये रात्री १० नंतरही अनेक कामगार जेवण करत बसलेले असतात. शहरात पाचपेक्षा जास्त नागरिक एकत्र दिसल्यास त्यांच्यावर जमावबंदी कायद्याअन्वये गुन्हा दाखल केला जातो. परंतु फळ मार्केटमध्ये रात्री दहानंतरही अनेक ठिकाणी १० ते २० रोजंदारीवरील कामगार एकत्रपणे गप्पा मारत बसलेले असतात. जावक गेटजवळील मोबाइलचे दुकानही मध्यरात्रीपर्यंत सुरूच असते. दिवसा व्यापार सुरू असल्यामुळे मार्केटमध्ये गर्दी असते. जीवनावश्यक वस्तूंमुळे फळ मार्केट सुरू ठेवण्यास परवानगी आहे. पण रात्री व्यापार बंद असतानाही मार्केटमध्ये २ हजारपेक्षा जास्त कामगार वास्तव्य करत आहेत. या कामगारांसाठी कोणतीही नियमावली लागू नसल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. अनागोंदी कारभारामुळे फळ मार्केटमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. अनेक व्यापारी, बाजार समितीचे अधिकारी यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. मार्केटमुळे शहरातही प्रादुर्भाव वाढत आहे.      

      महानगरपालिका प्रशासन शहरात सर्वत्र नियम मोडणारांवर कारवाई करत आहे. परंतु फळ मार्केटमध्ये सर्व नियम धाब्यावर बसविले जात असतानाही संबंधितांवर कडक कारवाई केली जात नाही. शहरात हॉटेल, मॉल व इतर दुकानदारांकडून ५० हजार रुपयांचा दंड घेतला जात आहे. परंतु फळ मार्केटमध्ये चोवीस तास गर्दी असूनही त्यांच्यावर कडक कारवाई का केली जात नाही, असा प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. व्यापार कोणत्या वेळेत करायचा, किती वाहनांची आवक झाली पाहिजे याविषयी नियमावली करण्याची व त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची आवश्यकता आहे. 

भाजी मार्केटमध्येही अनागोंदीचे वातावरणभाजीपाला मार्केट अत्यावश्यक सेवेत येत आहे. यामुळे हे मार्केटही चोवीस तास उघडे ठेवण्यात येत आहे. परंतु या सवलतीचा अनेक जण गैरफायदाही घेत आहेत. मार्केटमध्ये सोमवारी रात्री पाहणी केली असता काही ठिकाणी गांजा व मद्यप्राशन करत काही टोळकी बसली असल्याचेही निदर्शनास आले. अशा प्रकारे चुकीचे काम करणारांवर कोणीही अंकुश ठेवताना दिसत नाही. याशिवाय डी विंगमधील किरकोळ विक्रीवर व परवाना नसतानाही व्यापार करणारांवरही कारवाई केली जात नसल्याचेही निदर्शनास आले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या