शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

अभ्यासक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा समावेश व्हावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2017 03:18 IST

ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र भारताचा अविभाज्य घटक असलेले हैदराबाद संस्थान त्या वेळी भारतात समाविष्ट झाले नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना निजामांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत होते.

पनवेल : ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. मात्र भारताचा अविभाज्य घटक असलेले हैदराबाद संस्थान त्या वेळी भारतात समाविष्ट झाले नव्हते. त्यामुळे स्थानिक नागरिकांना निजामांच्या अत्याचाराला सामोरे जावे लागत होते. या अत्याचारा विरोधातच ठिणगी उठल्यानंतर हैदराबाद मुक्तीचा लढा उभा राहिला. त्यानंतर १७ सप्टेंबर १९४८ रोजी हा लढा यशस्वी होऊन हैदराबाद संस्थानचा भारतात समावेश करण्यात आला. मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त रविवारी खारघरमध्ये सत्याग्रह विद्यालयात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. माजी सनदी अधिकारी आर. के. गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली हा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.कार्यक्र मात मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या आठवणी, इतिहासाची माहिती देत तत्कालीन निजाम शासनाच्या अमानवीय अत्याचारातून कशाप्रकारे मराठवाडा, विदर्भातील नागरिकांची सुटका झाल्याची माहिती डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी दिली.मराठवाडा मुक्ती संग्रामचा लढा यशस्वी झाला नसता तर माझ्यासारखा सनदी अधिकारी निर्माण झाला नसता अशी कबुली कार्यक्र माचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी आर. के. गायकवाड यांनी दिली. लढ्यानंतर मोठी क्रांती झाली. सद्यस्थितीत मराठवाड्यातील तरुण जगभरातील अनेक देशांत शिक्षण, नोकरीनिमित्त वास्तव्यास असल्याचे गायकवाड यांनी सांगितले.महाराष्ट्रातील अभ्यासक्रमात मराठवाडा मुक्ती संग्रामाचा समावेश करणे गरजेचे आहे. सध्याच्या पिढीला या मुक्ती संग्रामाची माहिती असणे गरजेचे आहे. याकरिता राज्य सरकारबरोबर पत्रव्यवहार करणार असून, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये मराठवाडा मुक्ती संग्रामचे कार्यक्र म झाले पाहिजे, असेही डोंगरगावकर यांनी सांगितले.साहित्यिक संशोधक डॉ. किरणकुमार कवठेकर यांनीही मराठवाडा मुक्ती संग्रामावेळी अत्याचाराची माहिती उपस्थितांना दिली.या वेळी प्रावीण्य मिळवलेल्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. उपस्थितांमध्ये जोत्स्ना साबळे, सुजाता भोसले, वनिता सूर्यवंशी यांच्यासह विद्यार्थ्यांचा देखील समावेश होता.पनवेलमध्ये मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजराकळंबोली : मराठवाडा मित्र परिवार, नवी मुंबई यांच्या वतीने रविवारी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा करण्यात आला. या वेळी विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. मूळ मराठवाड्यातील उच्चपदस्थ व्यक्तींना या वेळी सन्मानित करण्यात आले.नवी मुंबई आणि पनवेल परिसरात देशाच्या कानाकोपºयातून नोकरी व्यवसायानिमित्त बहुभाषिक लोक स्थायिक झाले आहेत. त्यामध्ये मराठवाड्यातील नागरिकांची संख्या लक्षणीय आहे. या सर्वांनी एकत्रित येऊन मराठवाडा मित्र परिवाराची सहा वर्षांपूर्वी स्थापना केली.रविवारी मराठा मुक्ती संग्राम दिनानिमित्त खांदा वसाहतीत साईनंदन सभागृहात कार्यक्र म आयोजित करण्यात आला होता. या वेळी पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, मनोजकुमार सोमवंशी, डॉ. हर्षल लाहोटी, डॉ. कैलास जवादे, डॉ. राहुल भातांब्रे, नगरसेविका राजेश्री वावेकर, पुष्पा कुत्तरवडे, अ‍ॅड. क्र ांती चापके, बालाजी घुमे यांच्यासह मूळ मराठवाडावासीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. मूळच्या मराठवाड्यातील असलेल्या डॉ. कविता चौतमोल या महापौरपदी विराजमान झाल्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.