शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मराठी माणसाने स्वदेशीचा नारा देण्याची गरज

By admin | Updated: January 23, 2017 05:49 IST

अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी शपथ घेतल्याबरोबरच स्वदेशीचा नारा दिला. आपल्याकडे सर्वात आधी लोकमान्य टिळकांनी हा नारा दिला होता.

पनवेल : अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम यांनी शपथ घेतल्याबरोबरच स्वदेशीचा नारा दिला. आपल्याकडे सर्वात आधी लोकमान्य टिळकांनी हा नारा दिला होता. त्यानंतर महात्मा गांधींनी स्वदेशीची चळवळ सुरू केली. आज देशातील बहुतांश बाजारपेठ चिनी वस्तूंनी काबीज केली असून आता नव्याने स्वदेशीची घोषणा द्यायला हवी, असे प्रतिपादन माजी न्यायमूर्ती चंद्रशेखर धर्माधिकारी केले. पनवेल तालुक्यातील वाकडी येथील शांतिवन येथे रविवार मित्र मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. मेळाव्याला बाबा आमटे पुरस्कार विजेते वृक्ष मित्र मोहन हिराबाई हिरालाल, देवजी तोफा, रक्षा मेहता, जयवंत मठकर, कामगार नेते महेंद्र घरात, माजी जिल्हा परिषद सदस्य एकनाथ देशकर, सचिन पाटील सहायक संचालक कुष्ठरोग निवारण व मोठ्या प्रमाणात राज्यातून आलेले शांतिवन मित्र उपस्थित होते.सध्या मध्यमवर्गीयांची वृत्ती बदलत असून पाश्चात्यांचे अनुकरण वाढले आहे. त्यामुळे आपली अवस्था शेजारी राहायचे पण सोबत नाही राहायचे, अशी झाली आहे. आपल्याकडे कायदे जास्त पण अमलबजावणी कमी अशी परिस्थिती असल्याचे त्यांनी सांगितले.वृक्ष मित्र मोहन हिराबाई हिरालाल यांनी आमच्या राज्यात, आमच्या देशात, आमचे सरकार, आमच्या गावात आम्हीच सरकार असे केले तरच महात्मा गांधींचे स्वप्न पूर्ण होईल, असे त्यांनी सांगितले. गडचिरोली येथील आदिवासी मित्र देवजी तोफा यांनी माणसाने स्वत:वर विश्वास ठेवावा, शांतीवन मानवतेचे केंद्र असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी शरद नाईक पुरस्कार डॉ. दीपक नाईक व डॉ. राजेंद्र इटकरे यांना, शांताबाई धमणकर पुरस्कार नीला आपटे, मालती श्रीराम पुरस्कार चंद्रकांत चौधरी यांना देण्यात आला.