शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”
3
आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर प्राणघातक हल्ला: अनेक पोलिस एम्समध्ये दाखल
4
कार अन् ट्रकचा भीषण अपघात; एकाच कुटुंबातील सात जणांचा जागीच मृत्यू
5
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
6
VIRAL : 'थार' घेऊन डिलिव्हरी बॉय पार्सल द्यायला आला, बघणारा प्रत्येकजण अवाक् झाला! व्हिडीओ होतोय व्हायरल
7
"बाप्पा तुम्ही खूप भाग्यवान, नांगरलं कुणी, पेरलं कुणी अन्..."; पंकजा मुंडेंचा खासदार बजरंग सोनवणेंना टोला
8
आमिर खानला नाही आवडली दादासाहेब फाळकेंवरील सिनेमाची स्क्रिप्ट, नक्की कारण काय?
9
ऑनलाइन मागवलेल्या बिर्याणीत झुरळ, घटनेने उडाली खळबळ; कुठे घडला 'हा' किळसवाणा प्रकार?
10
टाटा-इन्फोसिससह 'या' शेअर्समध्ये वाढ! सलग दुसऱ्या दिवशी सेन्सेक्स-निफ्टी वधारले, कुठे झाली घसरण?
11
World Athletics Championships 2025 : नीरज चोप्राची फायनलमध्ये धडक; इथंही IND vs PAK महामुकाबला?
12
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
13
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
14
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
15
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
16
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
17
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
18
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
19
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
20
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यात महानगरपालिका करणार भाषेचा जागर; विविध कार्यक्रमांचे आयोजन

By योगेश पिंगळे | Updated: January 13, 2024 15:11 IST

नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

नवी मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने जारी केलेल्या 19 डिसेंबर 2023 रोजीच्या परिपत्रकानुसार 14 ते 28 जानेवारी 2024 या कालावधीत संपूर्ण राज्यभरात ‘मराठी भाषा संवर्धन पंधरवडा’ साजरा करण्यात येत आहे. त्यास अनुसरून साहित्यप्रेमी महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नवी मुंबई महानगरपालिकेने विविध कार्यक्रमांचे आयोजन केले असून मान्यवरांच्या व्याख्यानांसोबत अधिकारी, कर्मचारीवृंदामधील मराठी साहित्यप्रेमाला वाव देत नानाविध स्पर्धा उपक्रम संपन्न होत आहेत.

या कार्यक्रमांतून संपन्न मराठी भाषेचा प्रचार - प्रसार व्हावा तसेच कार्यालयीन कामकाजात मराठी भाषेचा जास्तीत जास्त प्रमाणात वापर व्हावा अशाप्रकारे पंधरवडा कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील कार्यक्रमाचा शुभारंभ 15 जानेवारी रोजी सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते प्रा.प्रवीण दवणे यांच्या ‘मायबोली मराठी’ या विषयावर उपस्थितांशी ह्रदयसंवादाने होणार असून सकाळी 11 वाजता महापालिका मुख्यालयातील ॲम्फीथिएटर येथे हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. 16 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता महाराष्ट्र शासनाचे निवृत्त माहिती संचालक, नाटककार आणि ललित लेखक प्रल्हाद जाधव यांचे कार्यालयीन कामकाजात मराठीचा वापर या अनुषंगाने ‘वाणी, भाषा, लेखणी आदी विषयावरील व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. 19 जानेवारी रोजी लेखक, निवेदक डॉ. मृण्मयी भजक या ‘अमेरिका खट्टी मीठी’ या नाट्य अभिवाचनात्मक कार्यक्रमातून मराठी चष्म्यातून आंबटगोड अमेरिकेची सफर घडविणार आहेत. महापालिकेच्या अधिकारी, कर्मचारी यांचा मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त आयोजित विविध उपक्रमांत प्रत्यक्ष सहभाग असावा यादृष्टीने त्यांच्याकरिता 3 स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

यातील पहिला स्पर्धा उपक्रम 23 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजल्यापासून राबविला जात असून यावर्षी भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून ‘माझे संविधान माझा अभिमान’ या विषयावर ‘वक्तृत्व स्पर्धा’ आयोजित करण्यात आलेली आहे. या स्पर्धेमध्ये 5 मिनिटे कालावधीत आपले विचार मांडायचे आहेत. याशिवाय दुस-या स्पर्धा उपक्रमांतर्गत मराठी कवितेचा समृद्ध वारसा महापालिकेचे अधिकारी, कर्मचारी यांच्याकडून वाचला जावा व त्यामधील आवडलेल्या कवितेचे त्यांनी सादरीकरण करावे यादृष्टीने 25 जानेवारी रोजी 'परकाव्यवाचन स्पर्धा' आयोजित करण्यात आलेली आहे.

यामध्ये महापालिका अधिकारी, कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या नव्हे तर इतर कवींच्या आवडत्या कवितेचे सादरीकरण करणे अपेक्षित आहे. कोणत्याही कामात व उपक्रमांमध्ये नाविन्यपूर्ण संकल्पना राबविण्यात नवी मुंबई महानगरपालिका नेहमीच आघाडीवर राहिली असून मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यातील कार्यक्रमही महापालिका आयुक्त नार्वेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनव प्रकारे आयोजित करण्यात आले आहेत. हे कार्यक्रम रसिक म्हणून अनुभवण्यासाठी नवी मुंबईकर नागरिकही श्रोते म्हणून सहभागी होऊ शकतात, त्यांचे स्वागत असेल असे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.