शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

मराठा क्रांती मोर्चाने केले वाशीत ठिय्या आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2018 03:21 IST

आरक्षणाचा आग्रह; शासनाची नोकरभरती थांबविण्याची मागणी

नवी मुंबई : मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने वाशीतील शिवाजी चौकामध्ये धरणे आंदोलन करण्यात आले. मराठा आरक्षण लवकर जाहीर करावे व आरक्षणाचा प्रश्न सुटेपर्यंत शासनाने प्रस्तावित नोकरभरती करू नये, अशी मागणी आंदोलकांनी केली.बीड जिल्ह्यातील परळी येथे मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. या मोर्चाला पाठिंबा देत नवी मुंबईमधील मराठा समाजाच्या संघटनांनी गुरुवारी ठिय्या आंदोलन केले. राज्य शासनाने मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या तत्काळ सोडवाव्यात. आरक्षण लवकर जाहीर करावे, असा आग्रह धरण्यात आला. राज्य शासनाने ७४ हजार कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. मराठा समाजाला आरक्षण जाहीर होईपर्यंत ही भरती करण्यात यावी. त्यामध्ये जेवढ्या जागा समाजाला येऊ शकतात त्या शिल्लक ठेवाव्या, अशी मागणी करण्यात आली.यावेळी विनोद साबळे, अंकुश कदम, वीरेंद्र पवार, राहुल गावडे, सूरज बर्गे, पंकज घाग, मयूर धुमाळ, अमित ढोमसे, सुनीता देशमुख, राजश्री कदम, प्रशांत सोळसकर, मोहन पाडळे, अभिजीत भोसले, राजेश टेकले, हरीश जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाNavi Mumbaiनवी मुंबई