शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
3
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
4
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
5
इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
6
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
7
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
8
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
9
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
10
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
11
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
12
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
13
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
14
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
15
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
16
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
17
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
18
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
19
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
20
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
Daily Top 2Weekly Top 5

चोरट्यांमुळे दीपावलीत अनेकांचं दिवाळं

By admin | Updated: November 17, 2015 00:43 IST

ऐन दीपावलीत चोरट्यांनी घरफोड्या करून अनेकांचं दिवाळं काढलं आहे. अवघ्या आठवड्यात दहाहून अधिक घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये सात लाखांहून

नवी मुंबई : ऐन दीपावलीत चोरट्यांनी घरफोड्या करून अनेकांचं दिवाळं काढलं आहे. अवघ्या आठवड्यात दहाहून अधिक घरफोडीच्या घटना घडल्या असून त्यामध्ये सात लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरीला गेला आहे.दीपावली सणाला हिंदू संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व असल्याने हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. तर सण साजरा करण्यासाठी अनेक जण नव्या दागिन्यांची तसेच इतरही वस्तूंची खरेदी करतात. शिवाय कामगारवर्गाला दीपावली साजरी करता यावी याकरिता कंपन्यांकडून बोनसही मिळत असतो. त्यामुळे दीपावलीत अनेकांच्या घरामध्ये दागदागिने तसेच मोठ्या प्रमाणात रक्कम जमा असते. असा लाखो रुपयांचा ऐवज घरातच ठेवून काही जण गावी देखील जातात. याचाच फायदा चोरट्यांकडून घेतला जातो. त्यानुसार ऐन दीपावलीमध्ये चोरट्यांनी शहरात दहाहून अधिक ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. सीबीडी, ऐरोली, खारघर, गोठीवली, तुर्भे तसेच इतर ठिकाणी या घटना घडलेल्या आहेत. त्यामध्ये सात लाखांहून अधिक किमतीचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. घरफोडीच्या या बहुतांश घटना सर्वसामान्य नागरिकांच्या घरी घडलेल्या आहेत. त्यामुळे ऐन दीपावलीत त्यांचं दिवाळं निघालं आहे. गोठीवली येथे घडलेल्या घटनेत चोरट्याने दागिने चोरताना कपाटामधील बिलाच्या पावत्याही चोरून नेल्या आहेत. तर वाशीत घटलेल्या घटनेत चोरट्यांनी दुकानदारांना लक्ष्य केले होते. ग्राहकांनी दिवसा गजबजलेल्या दुकानांमध्ये व्यवहारातून मोठी रक्कम जमा असल्याचा अंदाज लावून चोरट्यांनी त्याठिकाणी घरफोड्या केल्या होत्या. तर कळंबोली येथील सोनाराचेच अपहरण करून त्याला लुटण्याचा देखील अज्ञात चोरट्यांनी प्रयत्न केलेला आहे. यावरून नागरिकांकडून सणांचा आनंद लुटला जात असतानाच, चोरट्यांच्याही गुन्हेगारी हालचाली वाढत असल्याचे दिसत आहे. (प्रतिनिधी)