शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘ही’ ट्रिक वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
5
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
6
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
7
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
8
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
9
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
10
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
11
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
12
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
13
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
14
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
15
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
16
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
17
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
18
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
19
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
20
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
Daily Top 2Weekly Top 5

जिओमध्ये नोकरीच्या बहाण्याने अनेकांना गंडा; ३ अज्ञातांवर गुन्हा

By सूर्यकांत वाघमारे | Updated: July 4, 2023 16:58 IST

नियुक्तीचे ईमेल पाठवून पैशांची मागणी 

नवी मुंबई : रिलायन्स जिओमध्ये नोकरीच्या बहाण्याने अनेकांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. वेगवेगळ्या पदावर नोकरी लागल्याचे सांगून त्यांच्याकडून पैशांची मागणी केली जात आहे. काहींनी पैसे दिले असून काहींनी रिलायन्समध्ये संपर्क साधल्याने हा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी रिलायन्स जिओच्या वतीने पोलिसांकडे तक्रार करण्यात आली असून अज्ञात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रबाळे येथील रिलायन्स जिओमध्ये नोकरीच्या बहाण्याने काहीजण इच्छुकांना संपर्क साधत आहेत. त्यामध्ये एखाद्याने नोकरीची इच्छुकता दाखवल्यास त्यांना नोकरी लागल्याचे नियुक्तीपत्र देखील पाठवले जात आहे. यासाठी त्यांच्याकडे वेगवेगळ्या कारणांनी पैशाची मागणी होत आहे. दरम्यान त्यांना ईमेलद्वारे पाठवल्या जाणाऱ्या पत्रात रिलायन्स जिओचा लोगो व ट्रेडमार्क यांचा देखील वापर केला जात आहे. त्याद्वारे आपल्याला जिओ मध्ये नोकरी लागल्याचे समजून काहींनी त्या व्यक्तींना पैसे देखील दिले आहेत. दरम्यान काहींनी जिओच्या अधिकृत ईमेलवर संपर्क साधून त्यांची नियुक्ती झाल्याबद्दलची खात्री केली असता जिओच्या अधिकाऱ्यांच्या निदर्शनात हि बाब आली आहे. त्यानुसार मागील काही महिन्यात रिलायन्स जीओकडे ४४ जणांनी ईमेलद्वारे फसवणुकीची तक्रार केली आहे.

त्यावरून जिओमध्ये नोकरीच्या बहाण्याने मोठ्या प्रमाणात फसवणुकीचे प्रकार घडत असल्याचे कंपनीच्या निदर्शनात आले आहे. याप्रकरणी जिओ इन्फोकॉमचे उप व्यवस्थापक सुधीर नायर यांनी रबाळे एमआयडीसी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्याद्वारे अज्ञात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत.