शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
2
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
3
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
4
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
5
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन
6
"शरद पवार हे महाराष्ट्रातील कट कारस्थानाचा कारखाना, त्यांच्यावर..."; गोपीचंद पडळकरांची बोचरी टीका
7
७० वर्षांच्या आजारी आजीला पाठीवरुन घेऊन जाणारा नातू सोशल मीडियावर बनला हिरो
8
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
9
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
10
पीएम मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ तात्काळ हटवा; पाटणा उच्च न्यायालयाचा आदेश
11
दिल्ली-मुंबई हल्ल्यात मसूद अजहरचा हात; जैश कमांडर इलियासचा आणखी एक कबुलीजबाब
12
Ind Vs. Pak Asia Cup: आशिया कपमधून बाहेर गेल्यास पाकिस्तानचं कंबरडं मोडणार, होणार 'इतक्या' कोटींचं नुकसान
13
साखर कारखान्याच्या टँकरमध्ये सापडले दोन तरुणांचे मृतदेह, गार्ड आणि अधिकारी गायब  
14
अकोला हादरले! शासकीय रुग्णालयातच एकाची दगडाने ठेचून हत्या, शाब्दिक वादातून मित्रानेच घेतला जीव
15
NEET च्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या आरोपीचा पोलिसांकडून एन्काऊंटर
16
मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी कोटींची उधळपट्टी? कंत्राटदाराने २१ टक्के 'बिलो'ने काम घेतल्याने प्रकार उघडकीस
17
इनरवेअर बनवणाऱ्या शेअरचा जलवा! १०० स्टॉक्समधून एकाच महिन्यात २ लाख रुपयांची कमाई
18
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
19
"आमचे प्रेरणास्रोत..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींना इटलीच्या जॉर्जिया मेलोनी यांच्याकडून खास शुभेच्छा
20
अशक्यही होईल शक्य फक्त जिद्द हवी; १५ वर्षीय दृष्टीहीन करुणाने मिळवलं भारतीय संघात स्थान

रॅपिड अ‍ॅक्शन व्हॅनने वाचवले अनेकांचे जीव

By admin | Updated: June 6, 2016 03:03 IST

द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातांतील जखमींना तातडीची मदत मिळावी, यासाठी रस्ते विकास महामंडळाने काही महिन्यांपासून शीघ्र कृती व्हॅन तैनात ठेवल्या आहेत.

कळंबोली : द्रुतगती महामार्गावर होणाऱ्या अपघातांतील जखमींना तातडीची मदत मिळावी, यासाठी रस्ते विकास महामंडळाने काही महिन्यांपासून शीघ्र कृती व्हॅन तैनात ठेवल्या आहेत. रविवारी घडलेल्या भीषण अपघातातील जखमींसाठी या कृती व्हॅन उपयुक्त ठरल्या. अपघाताची माहिती मिळताच अजिवली येथील शीघ्र कृती व्हॅन दुर्घटनास्थळी दाखल झाली. भीषणता पाहून खालापूर आणि लोणावळा येथील आणखी दोन व्हॅन घटनास्थळी मागविण्यात आल्या. तिन्ही व्हॅनमधील १५ प्रशिक्षित जवानांनी उपलब्ध साधनांचा वापर करून मदतकार्य सुरू केले. मृत आणि जखमींना बाहेर काढण्यात आले. बसचा पत्रा कापून आत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. जखमींना तातडीच्या उपचारांसाठी कळंबोली येथील एमजीएम, पॅनेशिया, अष्टविनायक, प्राचीन या रुग्णालयांमध्ये हलविण्यात आले. बस २० फूट खोल दरीत कोसळल्याने मदत आणि बचावकार्यात अडथळे येत होते. १२ फुटांच्या दोन शिड्या, दोरखंडांच्या साहाय्याने जवळपास ५0 प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात या जवानांना यश आले. बसचा चालक इक्बाल बाबुलाल शेख (५0) हा स्टिअरिंगच्या मध्ये अडकला होता. त्याला बाहेर काढण्याकरिता पाऊण तास शर्थीचे प्रयत्न करावे लागले. उजव्या बाजूच्या काचा फोडून त्यातून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. हरिदास सूर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली चेतन पाटील, अभिषेक पाटील, औदुंबर हावळे, संदीप केदार, सुभाष काशीद, दिनेश धोत्रे, मिलिंद आडसुळ, प्रसन्ना भाटे, सूरज इंगळे, विनायक जाधव, प्रीतम पाटील या जवानांनी बचाव आणि मदतकार्य केले.पोलीस छावणीचे स्वरूप अपघातातील दृश्य आणि मदतकार्य पाहण्यासाठी महामार्गावर बघ्यांची एकच गर्दी झाली होती. अनेक जण वाहने थांबवून अपघाताची माहिती घेत होते. त्यामुळे महामार्गावर काही काळ वाहतूककोंडी झाली होती. वाहतूक नियंत्रणात ठेवण्याबरोबरच बघ्यांची गर्दी पांगविण्यासाठी महामार्गावर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यामुळे घटनास्थळाला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते.