शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याला मुहूर्त सापडेना !

By admin | Updated: February 6, 2016 02:23 IST

तालुक्यातील थेरोंडा येथे सुमारे ३६ कोटी ८७ लाख रुपये खर्चाच्या ग्रोयान्स बंधाऱ्याच्या बांधकामाला कंत्राटदाराला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही

अलिबाग : तालुक्यातील थेरोंडा येथे सुमारे ३६ कोटी ८७ लाख रुपये खर्चाच्या ग्रोयान्स बंधाऱ्याच्या बांधकामाला कंत्राटदाराला अद्याप मुहूर्त सापडलेला नाही. त्यामुळे प्रत्यक्ष कामाला सुरुवात न झाल्याने स्थानिक मच्छीमार हवालदिल झाले आहेत. कंत्राटदाराने कामाला लवकरच सुरुवात करावी यासाठी स्थानिकांनी मुख्यमंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री, पालकमंत्री आणि मत्स्य आयुक्तांना पत्राद्वारे साकडे घातले आहे. कंत्राटदाराने वेळेवर काम पूर्ण केले नाहीतर, त्याला दंड आकारण्यात यावा आणि प्रत्येक मच्छीमार बोटीमागे एक लाख रुपयांचे अर्थसहाय्य करावे, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.सरकारच्या कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्य व्यवसाय विभागामार्फत अलिबाग तालुक्यातील थेरोंड्यांच्या खाडी मुखाशी ग्रोयान्स पद्धतीचा बंधारा बांधण्यासाठी सरकारने ४२ कोटी रुपयांच्या अंदाजपत्रकास मान्यता दिली आहे. ७ जानेवारी २०१६ रोजी आर.बी. चव्हाण या कंत्राटदाराला हे काम मंजूर झाले. ३६ कोटी ८७ लाख ७० हजार ४२८ रुपये असा दर चव्हाण यांनी दिला होता. ग्रोयान्स बंधारा झाल्यामुळे स्थानिकांना आपापल्या होड्या चिखलात रुतवून मच्छी उतरावी लागणार नाही, होड्या सुरक्षित राहतील, त्याचप्रमाणे किनारपट्टीचे संरक्षण होणार आहे. तसेच ओहोटीच्या वेळीही खाडीमध्ये होड्या येऊ शकणार आहेत. त्यामुळे मच्छीमार चांगलेच खूश झाले होते. टेंडर मंजूर झाल्यावर लगेचच ठेकेदाराने जागेची पाहणी केली. त्याचप्रमाणे विविध आवश्यकती यंत्रसामग्रीही तेथे आणून ठेवण्यात आली होती.बंधाऱ्याचे काम वेगाने व्हावे यासाठी स्थानिक मच्छीमारांनी त्यांची मच्छी सुकविण्याची जागा कंत्राटदाराला वापरण्यास दिली होती. समुद्रकिनारी वाहनांची ये-जा करण्यासाठी स्थानिकांनी रस्ताही करुन दिला होता. परंतु त्यानंतर तेथे ठेकेदार फिरकलाच नाही. कामाला कधी सुरुवात होणार याची वाट स्थानिक सातत्याने बघत आहेत. (प्रतिनिधी)तीन महिन्यांनी पावसाळा सुरु होणार आहे. त्यामुळे बंधारा बांधणीचे काम युध्दपातळीवर होणे गरजेचे आहे. परंतु काम सुरु होत नसल्याने स्थानिक चिंतातूर झाले आहेत. थेरोंडा मच्छीमार विविध कार्यकारी सोयायटीच्या पदाधिकाऱ्यांनी काम सुरु करण्यासाठी थेट मुख्यमंत्री, मत्स्य व्यवसाय मंत्री यांना पत्राद्वारे साकडे घातले आहे.