शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

मलावी देशातील आंबा मुंबईत दाखल; प्रतीबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दर

By नामदेव मोरे | Updated: November 28, 2024 02:20 IST

प्रतीबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. मुंबईसह दिल्ली व गुजरातमध्ये हा आंबा रवाना करण्यात आला आहे...

नवी मुंबई : सर्वांना उत्सुकता लागून असलेल्या मलावी देशातील आंबा बुधवारी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दाखल झाला आहे. प्रतीबॉक्स ३ ते ५ हजार रुपये दराने आंब्याची विक्री झाली आहे. मुंबईसह दिल्ली व गुजरातमध्ये हा आंबा रवाना करण्यात आला आहे.प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात दक्षीण पूर्व अफ्रिकेमधील मलावी देशातील आंबा भारतामध्ये विक्रीसाठी येत असतो. ऐन हिवाळ्यात ग्राहकांना आंब्याची चव चाखता येते. यावर्षी एक आठवडा उशीरा आंब्याची आवक सुरू झाली आहे. मुंबई बाजार समितीमध्ये बुधवारी मलावी हापूसचे ९४५ बॉक्स व टॉमी अटकीन्स आंब्याचे २७० बॉक्स विक्रीसाठी दाखल झाले आहेत. एक बॉक्समध्ये आंब्याच्या आकाराप्रमाणे १० ते २० नग आहेत. तीन किलो वजनाच्या या पेटीला ३ हजार ते ५ हजार रुपये दर मिळाला आहे. बाजार समितीमधून मुंबई क्रॉफर्ड मार्केट फळ बाजार, ब्रीचकँडी, घाटकोपर, माटुंगा, जूहू, पुणे, दिल्ली, अहमदाबाद, राजकोट व इतर ठिकाणच्या मार्केटमध्ये हा आंबा विक्रीसाठी पाठविण्यात आला आहे.प्रत्येक वर्षी नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात मलावी चा आंबा मार्केटमध्ये येतो. यावर्षी एक आठवडा उशीरा आवक सुरू झाली आहे. डिसेंबर अखेरपर्यंत ग्राहकांना आंब्याची चव चाखता येणार आहे.संजय पानसरे, संचालक, मुंबई बाजार समितीकोकणातून १३ वर्षापुर्वी नेली रोपेकोकणातील हवामानाप्रमाणे मलावी देशातील हवामान आहे. भौगोलीक वातावरणातही साधर्म्य आहे. यामुळे मलावीमधील शेतकऱ्यांनी २०११ मध्ये कोकणातून हापूसची रोपे नेली होती. तेथे जवळ पास ४०० एकर मध्ये हापूसची बाग तयार केली आहे. प्रत्येक वर्षी नोव्हेंबरमध्ये हा आंबा विक्रीसाठी भारतामध्ये येत असून त्यासोबत तेथील टॉकी अटकिन्स आंबाही विक्रीसाठी येतो.कोणातील हंगाम उशीरागतवर्षी जानेवारीपासून कोकणच्या हापूसची नियमीत हावक सुरू झाली होती. परंतु यावर्षी कोकणचा हंगाम लांबणीवर जाण्याची शक्यता आहे. मार्चमध्ये नियमीत समाधानकारक आवक सुरू होईल असा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.