शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

आमसभेतून आमजनता बेपत्ता !

By admin | Updated: July 12, 2016 02:45 IST

महाडची आमसभा सोमवारी महाड पंचायत समितीने आयोजित केली होती. गेली पाच वर्षे ही आमसभा फक्त साधकबाधक चर्चेनेच पार पडत होती.

दासगाव : महाडची आमसभा सोमवारी महाड पंचायत समितीने आयोजित केली होती. गेली पाच वर्षे ही आमसभा फक्त साधकबाधक चर्चेनेच पार पडत होती. यावर्षी देखील आमसभा जुलै महिन्यात घेतल्याने शेतकरी शेतीच्या कामात गुंतल्याने अर्धेअधिक सभागृह रिकामे होते. शिवाय गेली पाच वर्षे तेच तेच प्रश्न उद्भवत असल्याने आणि सर्वसामान्यांना न्याय मिळत नसल्याने सोमवारी झालेल्या आमसभेतून आमजनता बेपत्ता झाल्याचे चित्र दिसत होते. उशिरा सुरू झालेली आमसभा संध्याकाळी चार वाजेपर्यंत केवळ एसटी महामंडळ आणि वीज मंडळ या दोनच विभागांच्या प्रश्नांवरच अडकली होती.ग्रामीण भागातील जनतेच्या प्रश्नांना न्याय मिळावा. लोकप्रतिनिधींसमोर अधिकाऱ्यांनी लोकांच्या प्रलंबित प्रश्नांची उत्तरे द्यावीत, यासाठी आमसभा सुरू करण्यात आली. स्थानिक आमदारांच्या अध्यक्षतेखाली या आमसभेचे आयोजन करण्यात येते. येथील जनता ग्रामीण आणि शेतीप्रधान असल्याने ही आमसभा शेतीकामाच्या वेळी नसावी, अशी अपेक्षा असते. मात्र गेली पाच-सहा वर्षे महाडची आमसभा पावसाळ्यात शेतकऱ्यांच्या लावणीच्या वेळेतच घेतली जात आहे. यामुळे ग्रामीण भागात नाराजी आहे. यावर्षीची आमसभा सोमवारी आयोजित करण्यात आली होती. निमंत्रण पत्रिकेत सकाळी ११ वाजताची वेळ टाकण्यात आली होती, मात्र प्रत्यक्षात दुपारी सव्वाबारा वाजता ही आमसभा सुरू झाली. त्यातच सुरुवातीचे स्वागत गीत, पदाधिकाऱ्यांचे स्वागत, दुखवटा ठराव, अभिनंदनाचे ठराव यामध्ये जवळपास तास गेला आणि बरोबर सव्वा वाजता प्रत्यक्ष इतिवृत्त वाचनास सुरुवात झाली.आमसभा एक तास उशिरा सुरू झाल्यानंतर ग्रामीण जनतेशी निगडीत असलेल्या समस्या पाहता पंचायत समितीच्या कामकाजावर चर्चा होणे अपेक्षित आहे, मात्र पंचायत समितीचे कामकाज दूर ठेवून अध्यक्षांनी अन्य शासकीय विभागांच्या कामावर चर्चा सुरू केली. सुरुवात एसटी विभागाने झाली. (वार्ताहर)