शहरं
Join us  
Trending Stories
1
काय म्हणावे याला...! कोलकातामध्ये SIR विरोधात मोर्चा काढला, दुसऱ्याच दिवशी ममता बॅनर्जींनी BLOकडून 'फॉर्म' स्वीकारला...
2
PM मोदींनी याही वर्ल्ड कप ट्रॉफीला स्पर्श केला नाही; जिंकली मने, जाणून घ्या स्पर्श न करण्यामागचे कारण
3
IPO उघडण्यापूर्वीच अब्जाधीश बनले 'या' कंपनीचे मालक; किती आहे प्राईज बँड? GMP मध्ये तेजी
4
कार बाजारात खळबळ! हिरो ईलेक्ट्रीक कार लाँच करणार; 'नोव्हस NEX 3' ची पहिली झलक दाखविली...
5
1 डिसेंबरपासून मोबाइल रिचार्ज प्लॅन पुन्हा महागणार, 199 रुपयांचा पॅक किती रुपयांना होणार? मोठा दावा
6
हृदयद्रावक! बॉलिंगनंतर पाणी प्यायला, उलटी होताच बेशुद्ध होऊन खाली पडला, मैदानावरच मृत्यू
7
Lenskart IPO: लिस्टिंग गेन मिळेल का, केव्हा होणार शेअरचं अलॉटमेंट? जाणून घ्या तुमच्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरं
8
"या नाटकाचा अविभाज्य घटक असलेली तू...", प्रिया मराठेच्या आठवणीत पुष्कर श्रोत्रीची भावुक पोस्ट
9
भारत इलेक्ट्रॉनिक्स ते पॉलीकॅब... 'या' ५ स्टॉक्सवर ब्रोकरेज 'बुलिश'; आगामी काळात तगडा परतावा देणार?
10
"काँग्रेस पराभव लपवण्यासाठी खोटे दावे करतेय"; मतचोरीवरून भाजपाचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
२.४० कोटींपैकी केवळ ८० लाख लाडक्या बहिणींचे eKYC पूर्ण, १८ नोव्हेंबरपर्यंतची मुदत; पुढे काय?
12
राहुल गांधींनी जिला 'ब्राझिलियन मॉडेल' म्हटलं, ती निघाली 'पिंकी'? काँग्रेसच्या मत चोरीच्या दाव्यानंतर, चकित करणारा खुलास!
13
इंदुरीकर यांच्या मुलीचा शाही साखरपुडा चर्चेत; एवढा खर्च कशासाठी?, महाराज म्हणाले...
14
"मी तीच रहस्यमयी महिला आहे..."; ब्राझीलच्या मॉडेलने केला भारतासाठी व्हिडिओ प्रसिद्ध 
15
"रस्ते चांगले असतील तर जास्त अपघात होतील"; बस अपघातावर भाजपा खासदाराचं वादग्रस्त विधान
16
Astro Tips: तुमच्या नशिबात प्रेम की धोका, हे कसे ओळखाल? ज्योतिष शास्त्र काय सांगते पाहा!
17
“अजित पवार कायम उप असतात, त्यांना ‘अखंड उप भव’ हा आशीर्वाद”; उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
18
"१८०० कोटींच्या जमिनीची ३०० कोटींमध्ये खरेदी, ४८ तासांत स्टँप ड्युटीही माफ"; दानवेंचा पार्थ पवारांवर गंभीर आरोप
19
Sensex Will Go Above 1 Lakh: वाईट काळ सरला..! पुढील वर्षी सेन्सेक्स गाठणार १ लाखांचा टप्पा, कोण म्हणालं असं?
20
यूएईकडून भारताला धोका? ६००० कोटींच्या घोटाळ्याचा मुख्य सूत्रधार दुबईतून गायब; सुप्रीम कोर्ट संतापले

घनकचरा व्यवस्थापनाचे नियोजन कोलमडले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 21, 2018 02:47 IST

पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन कोलमडले आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : पावसाळा सुरू झाल्यापासून महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचे नियोजन कोलमडले आहे. कचऱ्याचे प्रमाण ६५० वरून ९०० टन झाले आहे. वृक्ष छाटणी व त्या कचºयाची वाहतूक करताना तारेवरची कसरत करावी लागत असून अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे साचलेले दिसत आहेत.स्वच्छ भारत अभियानामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने उत्तम कामगिरी केली. घनकचरा व्यवस्थापनामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविला. स्पर्धेदरम्यान उत्तम कामगिरी करणाºया प्रशासनाची कामगिरी पहिल्याच पावसामध्ये रोडावली आहे. पावसाळ्यामध्ये वाढणाºया कचºयाचा अंदाज आलेला नाही. मनपा क्षेत्रामध्ये रोज ६५० ते ६७५ टन कचरा निर्माण होत असतो. पावसाळा सुरू झाल्यापासून हेच प्रमाण सरासरी ९०० टन झाले आहे. नागरिकांनी घरामधील जुने कपडे व साहित्य कचºयामध्ये टाकण्यास सुरवात केली असल्यामुळे त्याचा ताण कचरा वाहतूक करणाºया यंत्रणेवर पडला आहे. यामुळे पंधरा दिवसांपासून अनेक ठिकाणी कचºयाचे ढिगारे जैसे थे असल्याचे चित्र दिसू लागले आहे. पावसाळ्यात साचलेल्या कचºयामुळे दुर्गंधी निर्माण होत असून साथीचे आजार पसरण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे. स्वच्छता विभागाच्या कर्मचारी व अधिकाºयांना नगरसेवकांपासून नागरिक फोन करून कचरा उचलला नसल्याच्या तक्रारी करू लागले आहेत. अनेक नागरिकांनी आयुक्त रामास्वामी एन. यांच्याकडेही तक्रारी केल्या आहेत.शहरात पदपथ व रोडवरील वृक्षाच्या धोकादायक फांद्या तोडण्याचे आव्हानही पालिकेसमोर उभे राहिले आहे. वृक्ष छाटणीनंतर कचºयाची विल्हेवाट लावतानाही कसरत करावी लागत आहे. नागरिकांनी सोसायटीअंतर्गत वृक्ष छाटणी करून कचरा पदपथावर टाकण्यास सुरवात केली आहे. याशिवाय महापालिकेच्या उद्यान विभागाकडून नियमित वृक्षाच्या फांद्या तोडण्याचे काम सुरू आहे. काही वेळा १ हजार टन कचरा निर्माण होत असून तो क्षेपणभूमीवर घेवून जाण्यासाठीची यंत्रणा अपुरी पडू लागली आहे. घनकचरा विभागामध्ये देशात प्रथम क्रमांक मिळविलेल्या महापालिकेच्या पावसाळ्यामध्ये वाढणाºया कचºयाची वाहतूक करण्याचे नियोजन करता आलेले नाही. कचरा वाहतूक करणाºया ठेकेदारानेही अतिरिक्त मनुष्यबळ व वाहने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. पण योग्य काळजी घेतली नसल्याने शहरामध्ये कचºयाचे ढिगारे दिसू लागले असून नागरिकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरवात केली आहे. पावसामध्ये धोकादायक वृक्ष कोसळण्याच्या घटनाही वाढू लागल्या आहेत. अनेक ठिकाणी वाहनांवर वृक्ष कोसळले आहेत. बहुतांश सर्वच वार्डमधून नगरसेवकांनी व सर्वपक्षीय नागरिकांनी वृक्ष छाटणीसाठी प्रशासनाकडे तगादा लावला आहे. परंतु यंत्रणा अपुरी असल्यामुळे सर्व ठिकाणी एकाच वेळी वृक्षछाटणी करत येत नसल्याने प्रशासनाला नागरिकांच्या नाराजीला सामोरे जावे लागत आहे.>ठेकेदारावर कारवाई करावीपावसाळ्यामध्ये कचºयाचे प्रमाण वाढत असते. ठेकेदाराने वाढणाºया कचºयाची वाहतूक करण्यासाठी जादा मनुष्यबळ व वाहने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. परंतु ठेकेदाराने योग्य काळजी घेतलेली दिसत नसून निष्काळजीपणा केला आहे का याची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.>कचºयाचेप्रमाण वाढलेघनकचरा विभागाचे उपआयुक्त तुषार पवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाल्यापासून कचºयाचे प्रमाण सरासरी अडीचशे टन वाढले आहे. नागरिक घरातील उशा, गाद्या व इतर रद्दीही कचºयामध्ये टाकत आहेत. सोसायटीमधील वृक्षाच्या फांद्या व पालिकेने छाटणी केलेला कचराही नियमित उचलला जात आहे. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचेही त्यांनी सांगितले.