शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
4
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
5
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
6
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
7
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
8
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
9
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
10
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
11
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
12
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
13
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
14
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
15
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
16
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
17
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
18
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
19
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
20
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
Daily Top 2Weekly Top 5

महिलेची हत्या करणाऱ्यास अटक

By admin | Updated: November 15, 2016 04:56 IST

पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथील साईलीला इमारतीत राहणाऱ्या अंजली प्रवीण पवार (२७) हिची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

पनवेल : पनवेल तालुक्यातील आकुर्ली येथील साईलीला इमारतीत राहणाऱ्या अंजली प्रवीण पवार (२७) हिची गेल्या आठवड्यात हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. राजकुमार आदिनाथ पांडे (२८) असे आरोपीचे नाव आहे. अंजलीचे लग्न २०१४ मध्ये प्रवीण पवार याच्यासोबत झाले होते. त्यामुळे हत्येनंतर पहिला संशय तिच्या पतीवर घेण्यात आला. मात्र २०१५ मध्ये त्यांचा घटस्फोट झाल्याचे उघड झाले आहे. अंजली वेश्या व्यवसाय करीत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. त्यामुळे आकुर्ली येथील साईलीला इमारतीत तिला भेटायला कोणकोण येत होते, याचा तपास खांदेश्वर पोलिसांनी सुरू केला. अंजलीच्या शेजारी मोनिका नावाची महिला पती राजकुमार पांडेसह राहात होती. ३ नोव्हेंबरला मोनिका आपल्या मैत्रिणीसह गोव्यात गेली होती. त्या रात्री पांडे हा दारू पिऊन अंजलीच्या खोलीत गेला आणि तिच्याबरोबरच बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंजलीने विरोध केल्याने पांडेने शस्त्राने तिच्या गळ्यावर वार केले. चार दिवसांनी साईलीला इमारतीतील रहिवाशांना अंजलीच्या खोलीतून उग्र वास आल्याने त्यांनी खांदेश्वर पोलीस ठाण्यात तक्रार केली. हत्येपासून पांडे गायब असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्याच्यावर जवळपास २० गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. (वार्ताहर)