शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

ममता केनियातच : मोलीना कुलकर्णीने दिली पोलिसांना माहिती

By admin | Updated: July 11, 2016 23:22 IST

आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी ही केनियातच असून तिचा कधीतरी आपल्याला फोन येत असतो

जितेंद्र कालेकरठाणे : आंतरराष्ट्रीय ड्रग माफीया विकी गोस्वामी याची पत्नी अभिनेत्री ममता कुलकर्णी ही केनियातच असून तिचा कधीतरी आपल्याला फोन येत असतो. मात्र तिचा कोणता आणि कसला उद्योग आहे, याची कोणतीच माहिती नसल्याचे ममताची बहिण मोलीना मुकूंद कुलकर्णी (49) हिने ठाणे पोलिसांना सोमवारी नोंदविलेल्या जबाबात म्हटले आहे.

अडीच हजार कोटींच्या इफेड्रीन प्रकरणी ममता कुलकर्णी ही 14 क्रमांकाची आरोपी आहे. याप्रकरणी तिचा पती विकी गोस्वामीसह सात जणांचा ठाणो पोलीस शोध घेत आहेत. सोमवारी काही सुरक्षा रक्षकांसह मीरा रोड येथे राहणारी ममताची मोठी बहिण मोलीना हिचाही अमली पदार्थ विरोधी पथकाने जबाब नोंदविला. तिला मंगळवारी जबाब नोंदविण्यासाठी पाचारण करण्यात आले होते. परंतू, मंगळवारी साई बाबांचे नामस्मरण करण्याचा दिवस असल्यामुळे आपण सोमवारीच आल्याचेही तिने सांगितले. वडील मुकूंद कुलकर्णी हे मुंबईच्या प्रादेशिक परिवहन कार्यालयात आरटीओ अधिकारी होते. त्यांनीच काही रक्कम आपल्याला दिल्याने त्याच रकमेच्या व्याजावर आपला चरितार्थ भागविते. वडीलांचे 2009 मध्येच निधन झाले.

(ममता कुलकर्णीने दिले व्यवसायासाठी २ कोटी)

(ममता कुलकर्णी आरोपी क्र.१४)

याव्यतितिरिक्त ममता सध्या केनियात असते. कधीतरी तिचा फोन येत असतो. मात्र, विकी गोस्वामी किंवा इतर कोणाबाबतही आपल्याला काहीच माहिती नाही.याशिवाय, कोणी कोणाला इफेड्रीनची तस्करी केली, याचीही काहीच माहिती नसल्याचा दावा तिने केला. उशिर झालेला असल्यामुळे तिला पुन्हा जबाबासाठी बोलविण्यात येणार असल्याचे एका वरीष्ठ पोलीस अधिका:याने लोकमतला सांगितले. 

आणखी वाचा

ड्रग्जच्या रॅकेटमागे ममता कुलकर्णी! 

ममता कुलकर्णीला फ्लॅट विकणाऱ्या बिल्डरची चौकशी 

ममता कुलकर्णी ही आपली पत्नी नाही - विकी गोस्वामी