शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले तर कुपोषण आटोक्यात येऊ शकते

By admin | Updated: May 2, 2017 02:59 IST

वाढत्या कुपोषणाला पायबंद घालण्यासाठी दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर कुपोषण निर्मूलन सूचना, उपाय व नियोजन

कर्जत : तालुक्यातील वाढत्या कुपोषणाला पायबंद घालण्यासाठी दिशा केंद्र या सामाजिक संस्थेच्या वतीने तालुकास्तरावर कुपोषण निर्मूलन सूचना, उपाय व नियोजन सभा आयोजित करण्यात आली होती. अंगणवाडीसह घरातील पोषण सवयी बदलणे, स्थानिक पातळीवर रोजगारनिर्मिती करणे, बालविवाह थांबणे आदी सूचना गावपातळीवर काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि पालकांनी मांडल्या. या सूचनांच्या आधारे पुढील काळातील नियोजन आणि इतर शासकीय विभागामध्ये समन्वय करण्याचा निर्णय या सभेत घेण्यात आला. येथील शनिमंदिराच्या रवि किरण सभागृहामध्ये या सभेचे आयोजन करण्यात आले होते. आदिवासी भागातील कुपोषण कमी करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या डॉ. एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजेनेअंतर्गत तालुक्यातील ४७ गावे निवडली आहेत. या गावातील अंगणवाडी सेविका, आरोग्य कर्मचारी आणि आदिवासी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कुपोषण कमी करण्यासाठी अंगणवाडी सेवा सुधारण्यासोबतच कुपोषित मुलांना त्यांच्या घरी देण्यात येणाऱ्या पोषणाच्या सवयी बदलणे, बालविवाह थांबवणे, मुलांमधील जन्माचे अंतर वाढविणे, स्थलांतर थांबवणे, यासाठी स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध करून देणे, आरोग्याची काळजी घेणे, आरोग्यसेवा मिळणे, आदी सूचना या सभेत मांडण्यात आल्या.तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे यांनी किशोर वयापासून मुल सहा महिन्यांचे होईपर्यंत आरोग्याच्या दृष्टीने लोकांनी आणि आरोग्य कर्मचाऱ्यांनी काय काळजी घ्यावी? याबाबत मार्गदर्शन केले. प्रारंभी शैलेश डिखळे यांनी प्रस्ताविक केले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अशोक जंगले यांनी केले. या सभेला निवासी नायब तहसीलदार एल. के. खटके, तालुका आरोग्य अधिकारी सी. के. मोरे, एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी जयपाल गहाणे, खांडस प्राथमिक केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबुराव वळवी, कळंब प्राथमिक आरोग्यकेंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल लाडे आदींच्या उपस्थित समन्वय सभा घेण्यात आली. (वार्ताहर)