शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
2
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
3
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
4
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
5
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
6
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
7
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
8
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
9
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
10
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
11
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
12
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
13
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
14
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
15
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
16
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
17
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
18
पाकिस्तानचा दुहेरी डाव! US-इराण शांतता चर्चा निष्फळ ठरताच १३००० सैनिक सौदीत पाठवले, कारण काय?
19
IPL 2026: बॉल बॉयनं पाय धरताच व्यंकटेश अय्यरनं केलं असं काही, सर्वत्र होतंय कौतुक! 
20
'एक अब्ज डॉलर आणि लग्नासाठी एक सुंदर तरुणी द्या, अन्यथा...', या देशाच्या लष्कर प्रमुखाची तुर्कीला धमकी
Daily Top 2Weekly Top 5

मलनि:सारण वाहिनीतील पाणी खाडीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2019 00:14 IST

नेरुळ सेक्टर २ मधील स्मशानभूमीजवळ महापालिकेने टाकलेली मलवाहिनी गेल्या अनेक महिन्यांपासून फुटलेली आहे.

नवी मुंबई : नेरुळ सेक्टर २ मधील स्मशानभूमीजवळ महापालिकेने टाकलेली मलवाहिनी गेल्या अनेक महिन्यांपासून फुटलेली आहे. त्यामुळे मलमिश्रित सांडपाणी प्रक्रिया न होता खाडीत जात आहे. पालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष झाल्याने खाडीच्या बाजूला राहणाऱ्या सेक्टर ४ मधील नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे.नवी मुंबई शहरातील मलवाहिन्यांचे सांडपाणी मलनि:सारण केंद्रात सोडण्यात येते. या सांडपाण्यावर एरिएटर यंत्राच्या साहाय्याने प्रक्रि या केल्यानंतर ते पाणी खाडीत सोडले जाते. शहरातील विविध नोडमध्ये मलनि:सारण केंद्रे बनविण्यात आली असून मलनिस्सारण वाहिन्यांच्या माध्यमातून सांडपाणी मलनि:सारण केंद्रात सोडण्यात येते. नेरु ळ सेक्टर २ मधील मलनि:सारण केंद्रात नेरु ळमधील विविध सेक्टरमधून येणाºया सांडपाण्यावर प्रक्रि या केली जाते. या मलनिस्सायण केंद्रात येणारी नेरु ळ सेक्टर ४ येथील मलनिस्सारण वाहिनी गेल्या अनेक महिन्यांपासून फुटली आहे. यामुळे मलमिश्रित सांडपाणी खाडीत जात असून या परिसरात राहणाºया नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. परिसरात डासांचा प्रादुर्भावही वाढला आहे. त्यामुळे नागरिकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे. विशेष बाब म्हणजे फुटलेल्या मलवाहिनीपासून हाकेच्या अंतरावर महापालिकेच्या शाळेत नेरु ळ विभाग कार्यालय असून महापालिका अधिकाऱ्यांचे देखील याकडे दुर्लक्ष झाले आहे.फुटलेल्या मलवाहिनीमुळे परिसरात दुर्गंधी डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. परिणामी नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. याच नेरु ळ विभाग कार्यालय असून देखील महापालिका अधिकाºयांचे दुर्लक्ष करण्यात येत असल्याची माहिती येथील नागरिक नरेश भोईर यांनी दिली.>नेरु ळ विभागातील कार्यकारी अभियंत्यांना याबाबत माहिती देऊन सदर समस्येवर तत्काळ कार्यवाही करण्यात येईल.- सुरेंद्र पाटील,शहर अभियंता, न.मुं.म.पा.