शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

कोकण विभागात'महसूल दूत’ उपक्रम

By कमलाकर कांबळे | Updated: August 2, 2023 15:02 IST

कोकण विभागातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ‘महसूल दूत’ नेमण्यात आले आहेत. 

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई:  महसूल सप्ताहात शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना शासकीय योजनांकरिता आवश्यक असणारी कागदपत्रे, दाखले आणि इतर महत्त्वाच्या सेवा-सुविधांचा लाभ सहजरित्या मिळावा.  महसूल संबंधित दाखले व इतर बाबी मिळविण्यासाठी विनाकारण खर्च होणारा वेळ व पैशांची बचत व्हावी,या उद्देशाने विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्या संकल्पनेतून कोकण विभागातील प्रत्येक जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी ‘महसूल दूत’ नेमण्यात आले आहेत. 

राज्यभरात  १  ते ७ ऑगस्ट या कालावधीत  महसूल सप्ताह कोकण विभागात विविध कार्यक्रमांच्या आयोजनासह मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येत आहे.  महसूल सप्ताहामध्ये कोकण विभागातील प्रत्येक जिल्ह्यात सात-बाऱ्यावर महिलांचे नाव लावणे, कातकरी उत्थान कार्यक्रमाअंतर्गत दाखल्यांचे वाटप करणे, महसूल संबंधित विविध योजनांमधील लाभार्थ्यांना दाखले वाटप करणे, महसूल विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची वैद्यकीय तपासणी करणे, युवासंवाद कार्यक्रमाअंतर्गत स्पर्धा परीक्षेसाठी स्पर्धा परीक्षा केंद्रांवर कार्यक्रम घेणे ही सर्व कामे सुलभरित्या व्हावी, सामान्य नागरिकांना, विद्यार्थ्यांना तसेच वयोवृध्दांना या सेवेचा लाभ घेताना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नये, त्यांच्या वेळेची व पैशांची बचत व्हावी यासाठी विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी कोकण विभागातील प्रत्येक जिल्हा व तालुकास्तरावर ‘महसूल दूत’ नेमण्याचे आदेश दिले आहेत.  त्या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात आली असून, कोकण विभागातील सर्व जिल्हा व तालुक्याच्या ठिकाणी महसूल दूतांची नियुक्ती करण्यात आली आहे. महसूल दूतांच्या दैनंदिन कामकाजाचा आयुक्त स्वत: आढावा घेत आहेत. 

महसूल सप्ताहात कोकण विभागातील नागरिकांसाठी उपलब्ध करुन दिलेल्या महसूल दूतांच्या सेवेचा विभागातील शेतकरी, विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, माजी सैनिक, वयोवृध्द अशा सर्वांनी जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन कोकण विभागीय आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी केले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई