नेरळ : यंदा महाशिवरात्री सोमवारी आल्याने शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. कर्जत तालुक्यात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.कर्जत तालुक्यातील पांडवकालीन वैजनाथ येथील मंदिरात शिवभक्तांनी प्रचंड गर्दी केली होती. वैजनाथ येथील मंदिरात शिवभक्तांसाठी लहान यात्रा तेथे भरली होती. दिवसभर कर्जत तालुक्याबरोबर अन्य तालुक्यातील भाविकांची दर्शनासाठी वर्दळ सुरु होती. कोल्हारे येथे त्रिवेणी संगमावर असलेल्या पांडवकालीन शिवमंदिरामध्ये शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी सकाळी प्रचंड गर्दी झाली होती. तेथील मंदिर हे उल्हास-चिल्लार-पेज या तीन नद्यांच्या संगमावर आणि नदीपात्रात असल्याने दुपारनंतर तेथे नदीच्या पाण्यात वाढ झाल्यानंतर शिवलिंग पाण्यात बुडत असल्याने दुपारपर्यंत मोठ्या संख्येने शिवभक्त गर्दी करून होते. तेथे सकाळपासून भजनाचे कार्यक्र म सुरु होते, तर नेरळ येथील हनुमान मंदिर येथील सालाबादप्रमाणे पायी दिंडी संगमेश्वर मंदिर येथे पोहचली. तेथे त्या वारकऱ्यांनी भजन आणि कीर्तनाचा कार्यक्र म सादर केला. मानिवली, बिरदोले, शेलू, धामोते येथील धनेश्वरी आणि मिरकुटे यांचे खाजगी मंदिर, नेरळमधील कुसुमेश्वर मंदिर, निर्माण नगरी येथील शिवमंदिर, मोहाचीवाडी, भडवळ, बेकरे, पाषाणे, कळंब, पोही, खांडस, देवपाडा, वंजारपाडा, गुडवण, कशेळे, कोठींबे, अंबिवली, मांडवने, चांदई, कडाव, तमनाथ, बीड, देऊळवाडी आदी ठिकाणीच्या शिव मंदिरात सर्वत्र भक्तांची गर्दी होती. माथेरान येथील पिसरनाथ महाराज मंदिरात धार्मिक कार्यक्र मांची रेलचेल होती. (वार्ताहर)> श्री कपालेश्वराची पालखी मिरवणूककर्जत : तालुक्यातील श्री कपालेश्वराची पालखी मिरवणूक सायंकाळी काढण्यात आली. त्याचवेळी मंदिरात दीपकबुवा करोडे आणि सहकारी यांचे भजनाच्या कार्यक्र माचे आयोजन करण्यात आले होते. कपालेश्वराच्या दर्शनासाठी पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दिवसभर भाविकांची रीघ लागली होती.महाशिवरात्रीनिमित्त मंदिरात विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले होते. ३ ते ५ मार्च पासून मंदिरात ह. भ. प. श्रीराम पुरोहित यांचे कीर्तन ठेवण्यात आले होते. आज महाशिवरात्रीनिमित्त पहाटे पुणे येथील तुपे बंधू यांचे सनईवादन, श्री कपालेश्वराची महापूजा केली. लघुरु द्र अभिषेक त्यानंतर सामूहिक शिवलीलामृत वाचन झाले. रात्री आरतीने मिरवणुकीची सांगता करण्यात आली. आज सोमवारी आलेल्या महाशिवरात्रीमुळे शिवभक्तांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येत होता. कर्जत तालुक्यात मोठ्या उत्साहात महाशिवरात्री साजरी करण्यात आली. मुद्रेश्वर मंदिरातही दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती. तालुक्यातील सर्वच शिवमंदिरात उत्साहात महाशिवरात्री साजरी झाली.> दुसऱ्या दिवशी सांगताआगरदांडा : मुरुड तालुक्यातील गुरव पाखाडी येथील प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. या मंदिरात प्रत्येकाची मनोकामना पूर्ण होते. या शहरात व ग्रामीण भागात हे एकमेव शिवमंदिर असल्याने भाविकांनी गर्दी केली होती. माघ कृष्ण चतुर्दशी ही तिथी महाशिवरात्र म्हणून पाळली जाते. या दिवशी उपवासाचे व्रत करतात. भगवान शिवाची आराधना आणि प्रार्थना करून दुसऱ्या दिवशी व्रताची सांगता केली जाते. माघ वद्य त्रयोदशीला महाशिवरात्री म्हणतात.