शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
2
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
3
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
4
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
5
Heels History: सुरुवात झाली पुरुषांसाठी, मग महिलांच्या फॅशनचा भाग कशा बनल्या 'Heels'?
6
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातचे ते 'पाप' ४६ वर्षे जुने; गावकऱ्यांनी दिलेला चोप, एका रात्रीत गाव सोडून पळाला
7
IPL 2026: शुभमन गिलनं नियम मोडला, बीसीसीआयनं ठोठावला १२ लाखांचा दंड, असं घडलं तरी काय?
8
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
9
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
10
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
11
छोटीशी चूक अन् हातात आलेला सामना गमावला, डेव्हिड मिलर ड्रेसिंग रूममध्ये ओक्साबोक्सी रडला, अखेर...
12
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
13
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
14
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
15
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
16
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
17
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
18
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
19
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
20
Latest Marathi News LIVE: डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
Daily Top 2Weekly Top 5

‘घारापुरी‘ची महाराष्ट्र प्रदूषण मंडळ करणार पाहणी

By admin | Updated: January 3, 2017 05:44 IST

घारापुरी बेटावर होत असलेल्या वाढत्या प्रदूषणाबाबत शिवसेना विभाग प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांच्या तक्रारीची दखल महाराष्ट्र प्रदूषण

उरण : घारापुरी बेटावर होत असलेल्या वाढत्या प्रदूषणाबाबत शिवसेना विभाग प्रमुख तथा ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांच्या तक्रारीची दखल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतली आहे. येत्या महिन्यात जेएनपीटी बंदरासंदर्भात जनसुनावणीत या विषयाला प्राधान्याने अग्रक्रम देवून येत्या आठवड्यात बेटाची पाहणीही करण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ यांनी दिली. घारापुरी बेटाची होणारी धूप, समुद्रातून वाहत येणारा कचरा आणि समुद्रात सोडले जाणारे तेल यामुळे घारापुरी बेटावर पर्यावरणाची समस्या निर्माण झाली आहे. याबाबत तहसीलदारांपासून जिल्हाधिकाऱ्यांकडेही तक्रारी केल्या आहेत. मात्र त्यानंतरही कोणतीही उपाययोजना झालेली नाही. त्यामुळे बेटावरील पर्यावरणाचा प्रश्न अधिकच गंभीर झाला आहे. याकडेही बळीराम ठाकूर यांनी लक्ष वेधले आहे. याबाबत त्यांनी उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ यांचीही भेट घेवून चर्चा केली. या चर्चेत घारापुरी बेटावरील वाढत्या प्रदूषणाबाबत चर्चा करण्यात आली. चर्चेनंतर येत्या २३ जानेवारी रोजी जेएनपीटीच्या बहुउद्देशीय सभागृहात जनसुनावणी आयोजित केली आहे. या जनसुनावणीमध्ये या विषयाला प्राधान्याने अग्रक्रम देवून चर्चा केली जाईल. तसेच येत्या आठवड्यात बेटाची पाहणीही क रण्यात येणार असल्याची माहिती उपप्रादेशिक अधिकारी एस. एच. पडवळ यांनी दिली.जेएनपीटीकडे प्रमुख मागण्याजागतिक दर्जाचे बेट जेएनपीटी दत्तक घेवून पर्यटक आणि नागरिकांना आवश्यक सुविधा पुरविण्यात याव्यात. बेटावर संरक्षित भिंत बांधण्याच्या कामाचे केलेले उद्घाटनाच्या कामाची अंमलबजावणी करण्यात यावी. बेटाच्या स्वच्छतेसाठी समुद्र किनाऱ्यावर येणारा कचरा उचलण्याचे काम स्थानिक ट्रस्ट किंवा सामाजिक संस्थेकडे सोपविण्यात यावे, स्थानिकांबरोबरच उरण, पनवेल, नवी मुंबई भागातून येणाऱ्या पर्यटकांसाठी दळणवळणाची सोय उपलब्ध करून द्यावी, स्थानिक मच्छिमारांना आर्थिक नुकसान भरपाई आणि मच्छिमारांना ओळखपत्रे देण्यात यावीत, स्थानिक बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून द्यावा, खोली वाढविण्यासाठी लावण्यात येणाऱ्या स्फोटकांमुळे नुकसान झालेल्या घरांना आर्थिक नुकसान भरपाई मिळावी, बेटावर बसविण्यात आलेल्या सिग्नलची देखभाल करण्याचे काम स्थानिकांना मिळावे, अशा अनेक मागण्या शिवसेना विभाग प्रमुख आणि ग्रा. पं. सदस्य बळीराम ठाकूर यांनी जेएनपीटी अध्यक्षांकडे केली तक्रारीतून आहे. (वार्ताहर)