शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 : उरणमध्ये भाजपची दुटप्पी भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 12, 2019 05:04 IST

राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे.

नवी मुंबई : राज्यातील चार बंडखोर उमेदवारांची भाजपने पक्षातून हकालपट्टी केली आहे; परंतु उरण मतदारसंघातील बंडखोर उमदेवार महेश बालदी यांच्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. यामुळे या बंडखोरीला पक्षाचे पाठबळ असल्याचा समज निर्माण होऊ लागला आहे. पनवेलमधून शिवसेनेने माघार घेऊन युती धर्माचे पालन केले; परंतु उरणमध्ये मात्र भाजपने बंडखोरी माघारी घेतली नसल्याने शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी निर्माण झाली आहे.राज्यातील अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना व भाजपमध्ये बंडखोरी झाली आहे. दोन्ही पक्षाच्या प्रमुखांनी बंडखोरांना उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन केले होते. जे माघार घेणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. भाजपने मीरा-भार्इंदरमध्ये आमदार नरेंद्र मेहता यांच्या विरोधात बंडखोरी करणाºया गीता जैन यांच्यासह राज्यातील चार ठिकाणच्या बंडखोरांवर कारवाई केली आहे; परंतु रायगड जिल्ह्यातील उरण मतदारसंघामधील बंडखोर उमेदवार महेश बालदी यांच्यावर अद्याप काहीही कारवाई केलेली नाही. युतीमध्ये ही जागा शिवसेनेला देण्यात आली असून, विद्यमान आमदार मनोहर भोईर निवडणूक लढवत आहेत. २०१४ च्या निवडणुकीमध्ये भाजपचे महेश बालदी तिसºया क्रमांकावर होते.नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये येथूनही शिवसेना उमेदवाराला मोठे मताधिक्य मिळाले होते. युती झाल्यामुळे शिवसेनेला त्याचा लाभ झाला असता; परंतु बालदी यांनी बंडखोरी केल्याने शिवसेनेची डोकेदुखी वाढली आहे. बालदी यांनी शक्तिप्रदर्शन करून उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यांचा अर्ज भरताना भाजपचे पनवेलरायगडमधील अनेक पदाधिकारी उपस्थित होते. पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूरही अर्ज भरताना उपस्थित होते.पनवेलमध्ये शिवसेनेचे बबन पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्यांनी माघार घेतली तर उरणमध्ये भाजप माघार घेईल, अशी चर्चा पहिल्यांदा सुरू होती. पनवेलमधून शिवसेनेने माघार घेऊन युती धर्माचे पालन केले; परंतु उरणमध्ये भाजपने बंडखोरी कायम ठेवली आहे. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष असल्याने बालदी यांच्यावर कारवाई केली जाईल, असे बोलले जात होते; परंतु अद्याप काहीही कारवाई झालेली नाही. बालदी यांनी नगरसेवक ते नगराध्यक्ष व जेएनपीटीचे विश्वस्त म्हणूनही काम केले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विश्वासू म्हणूनही ते ओळखले जातात. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे पाठबळ असल्याने त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचेही बोलले जात आहे. तालुक्यातील पक्षाचे पदाधिकारीही त्यांचाच प्रचार करत असल्याचे बोलले जात आहे. यामुळे शिवसेना पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, उरणमधील बंडखोरी पक्षाच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या लक्षात आली असून ते यावर उचित निर्णय घेतील, असे त्यांनी स्पष्ट केले.कारवाई न झाल्यास चुकीचा संदेश- रायगड जिल्ह्यातील पनवेल मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनी बंडखोरी मागे घेऊन भाजपला पूर्ण सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. त्याच धर्तीवर उरणमध्येही भाजप-शिवसेना उमेदवाराला सहकार्य करेल, अशी अपेक्षा सर्वांना होती; परंतु भाजप उमेदवाराची बंडखोरी कायम असून त्यांच्यासोबत तालुक्यातील पदाधिकारीही आहेत.- बंडखोर उमेदवारावर कारवाई झाली नसल्यामुळे त्याचा चुकीचा संदेश जिल्ह्यात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बंडखोर उमेदवाराला पक्षाचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याचा समज निर्माण होऊ शकतो.नेत्यांच्या छायाचित्रांचाही वापरभाजपचे बंडखोर उमेदवार महेश बालदी यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी तयार केलेल्या पत्रकांवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पक्षाच्या प्रमुख नेत्यांचे फोटोही वापरले आहेत.याविषयी शिवसेना पदाधिकाºयांनी भाजपच्या नेत्यांना माहिती दिली आहे; परंतु अद्याप त्याविषयी पक्षाकडून ठोस भूमिका घेण्यात न आल्याने मतदारसंघात संभ्रम आहे.

टॅग्स :uran-acउरणNavi Mumbaiनवी मुंबईpanvel-acपनवेलRaigadरायगड