शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र भवनची वास्तू लवकरच !

By admin | Updated: June 1, 2016 03:02 IST

वाशी नियोजित महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी पाहणी गेली. कामानिमित्त बाहेरगावाहून आलेल्यांच्या निवासाची अडचण

नवी मुंबई : वाशी नियोजित महाराष्ट्र भवनसाठी आरक्षित असलेल्या भूखंडाचा आमदार मंदा म्हात्रे यांनी मंगळवारी पाहणी गेली. कामानिमित्त बाहेरगावाहून आलेल्यांच्या निवासाची अडचण दूर करण्यासाठी शहरात महाराष्ट्र भवनची निर्मिती होणे आवश्यक आहे, असल्याचे मत यावेळी आमदार म्हात्रे यांनी व्यक्त केली. सिडकोने वाशी रेल्वे स्थानकाजवळ सेक्टर ३०ए येथे भवन निर्मितीसाठी देशातील बहुतांश राज्य सरकारांना भूखंड उपलब्ध करून दिले आहेत. नियोजित महाराष्ट्र भवनसाठीचा सिडकोने १९९८ साली आरक्षित केलेला सुमारे आठ हजार चौरस मीटरचा भूखंड आजतागायत मोकळा पडून आहे. सध्या या भूखंडाचा वापर वाहन पार्किंगसाठी किंवा विविध महोत्सवांसाठी करण्यात येतो, याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. या भूखंडावर राज्य शासनाच्या माध्यमातून नियोजित महाराष्ट्र भवन उभारल्यास विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र व कोकण विभागातून मुंबई येथे शासकीय अथवा इतर कामासाठी येणाऱ्या लोकप्रतिनिधी आणि अधिकारी वर्गाला हक्काचे शासकीय विश्रामगृह प्राप्त होईल. या भवनात स्थानिक प्रकल्पग्रस्त व इतर महिला मंडळे, बचतगट यांच्या उत्पादनांना बाजारपेठही उपलब्ध करून त्यांना रोजगाराची संधी देण्याची कल्पना आमदार म्हात्रे यांनी यावेळी मांडली. या भूखंडावर नियोजित महाराष्ट्र भवन उभारणीचा लवकरात लवकर प्रारंभ व्हावा, यासाठीही मुख्यमंत्र्यांकडे सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. लवकरच महाराष्ट्र भवन नवी मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचा ठाम विश्वासही त्यांनी व्यक्त केले आहे. या पाहणी दौऱ्यास आमदार मंदाताई म्हात्रे यांसोबत सिडकोचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत सामदसानी, भाजपाचे पदाधिकारी डॉ. राजेश पाटील, गोपाळराव गायकवाड, श्रीराम घाटे, संतोष पळसकर, दामोदरन पिल्ले, प्रमिला खडसे आदी उपस्थित होते.