शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

ग्राहकांच्या फसवणुकीप्रकरणी महालँड प्रमुखाला अटक; सव्वा कोटींचा अपहार

By सूर्यकांत वाघमारे | Updated: September 27, 2023 17:31 IST

: प्लॉट, घरे देण्याच्या बहाण्याने अनेकांना गंडा

नवी मुंबई : उरण व सी लिंक परिसरात प्लॉट, घरे देण्याच्या बहाण्याने पैसे घेऊन फसवणूक करणाऱ्या महालँड कंपनीच्या प्रमुखाला गुन्हे शाखा पोलिसांनी अटक केली आहे. गुन्हा दाखल झाल्यांनतर मागील पाच महिन्यांपासून पोलिस त्याच्या शोधात होते. अखेर मंगळवारी रात्री त्याला अटक करण्यात आली आहे. 

महालँड कंपनीच्या माध्यमातून ५० हुन अधिकांची फसवणूक झाल्याची घटना काही महिन्यांपूर्वी समोर आली होती. कंपनीचा प्रमुख पंडित धावजी राठोड याने २०१५ मध्ये मेट्रोसिटी कंपनीच्या माध्यमातून ग्राहकांकडून प्लॉट, घरे यासाठी पैसे घेतले होते. त्यानंतर त्याने कंपनीचे विभाजन करून स्वतःची महालँड कंपनी सुरु केली होती. त्याने केलेल्या जाहिरातबाजीला भुलून अनेकांनी सी लिंक परिसरात घरे, प्लॉट घेण्यासाठी बुकिंगसाठी ७ ते १० लाख रुपये दिले होते. मात्र एक वर्षात ताबा देणार सांगूनही पाच वर्ष उलटूनही त्याने घरांचा ताबा दिला नव्हता. यामुळे फसवणूक होत असल्याचे निदर्शनास येताच संबंधितांनी मनसेकडे तसेच पोलिसांकडे तक्रार केली होती. परंतु गुन्हा दाखल होत नसल्याने मनसे शहर अध्यक्ष गजानन काळे यांच्या शिष्टमंडळाने तत्कालीन पोलिस आयुक्त बिपीनकुमार सिंग यांचीही भेट घेतली होती.

अखेर मे महिन्यात याप्रकरणी सीबीडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून आर्थिक गुन्हे शाखेने तपासला सुरवात केली होती. मात्र गुन्हा दाखल होताच पंडित राठोड याने धूम ठोकली होती. तेंव्हापासून पोलिस त्याच्या मागावर असताना मंगळवारी त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीत अधिक गोष्टींचा उलगडा होण्याची शक्यता आहे. दरम्यान त्याने गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी इतरही काही कंपन्या व दलाल यांची मदत घेतल्याची शक्यता आहे. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखा कक्ष एक अधिक तपास करत आहे.