शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

महाडमध्ये थकबाकीदारांचा वीजपुरवठा तोडण्यास सुरुवात; यादीत ३० हजार ग्राहक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2021 00:33 IST

महावितरणकडून कारवाई सुरू; ३७० जणांचा वीजपुरवठा खंडित

लोकमत न्यूज नेटवर्कदासगाव : कोरोनाच्या काळात संपूर्ण महाराष्ट्रात वीजबिल थकले होते. सरकारने वारंवार ग्राहकांना दिलासा देण्याचे नेहमी आश्वासन दिले. आठ दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्र्यांनी वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित केला जाणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र अचानक ऊर्जामंत्र्यांनी थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे आदेश दिल्याने महाड तालुक्यात वीजबिल थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम महावितरणकडून करण्यात येत आहे. गुरुवारी संध्याकाळपर्यंत महाड तालुक्यात ३७० थकीत वीजबिल ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आल्याची माहिती महावितरण सूत्राकडून देण्यात आली.

कोरोना महामारीच्या काळात जवळपास नऊ महिने वीजबिल महावितरणच्या ऑफिसमध्ये भरण्याची प्रक्रिया बंद होती. ऑनलाइन वीजबिल स्वीकारली जात होती. वीजग्राहकांचा समज होता की या काळातील वीजबिल माफ होतील किंवा यामध्ये काहीतरी सूट देण्यात येईल. मात्र असे न होता अचानक ७ ते ८ महिन्यांची बिलं भरमसाठ आली. वीजग्राहकांनी कल्पनाही केली नव्हती एवढी बिलं येतील. दर महिना येणाऱ्या बिलामध्ये दुपटीने वाढ झाली. बिलवाढीची तक्रार संपूर्ण महाराष्ट्रात येऊ लागली. बिल कमी करण्यासाठी महावितरणाच्या कार्यालयामध्ये नागरिकांच्या रांगा लागू लागल्या. मात्र कार्यालयामध्ये थातूरमातूर उत्तर देऊन ग्राहकांची समज काढत तुम्हाला बिल भरावी लागतील, असे सांगून परत पाठवले जात होते. आजपर्यंत कोणत्याही थकबाकी वीजग्राहकाला महावितरणच्या कार्यालयामधून समाधानकारक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे आज मोठ्या प्रमाणात महावितरणचे वीजबिल बाकी राहिलेली आहे. कोरोना महामारी अगोदर दर महिने येणारे वीजबिल कमी येत होते मग अचानक दुपटीने ही वीजबिल वाढली कशी? याचे उत्तर आजही महावितरणकडे नाही. थोडक्यात पाहिले तर सरकारने कोरोनाच्या काळात लॉकडाऊन करून वीजग्राहकांवर अन्यायच केला आहे. ऊर्जामंत्र्यांच्या आदेशानंतर संपूर्ण महाराष्ट्रात महावितरणने गुरुवारपासून वीजबिल थकीत असलेल्या ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्याचे काम सुरू केले आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई