शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

मदयधुंद तरुणांकडून पोलिसांना मारहाण

By admin | Updated: September 26, 2016 02:25 IST

नाकाबंदीत चौकशीसाठी थांबवल्यामुळे तिघा मद्यधुंद तरुणांनी पोलिसांसह नागरिकांना मारहाण केल्याची घटना सानपाडा येथे घडली.

नवी मुंबई : नाकाबंदीत चौकशीसाठी थांबवल्यामुळे तिघा मद्यधुंद तरुणांनी पोलिसांसह नागरिकांना मारहाण केल्याची घटना सानपाडा येथे घडली. वाहनाची कागदपत्रे न दाखवता पोलिसांशी हुज्जत घालत त्यांनी हा प्रकार केला. याप्रकरणी सानपाडा पोलिसांनी तिघांवर गुन्हा दाखल करून अटक केली आहे. उरण येथील कथित घटनेच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलिसांचा चोख बंदोबस्त असून ठिकठिकाणी नाकाबंदी देखील सुरू आहे. यानुसार शुक्रवारी संध्याकाळी सानपाडा पोलिसांतर्फे सुरू असलेल्या नाकाबंदीत हा प्रकार घडला. नाकाबंदीच्या मार्गावरून तिघे जण स्कुटीवरून जात असताना, त्याठिकाणचे वाहतूक पोलीस कुमार चंदनशिवे यांनी त्यांना चौकशीसाठी थांबवले. यावेळी तिघेही मद्यधुंद अवस्थेत होते. त्यांनी पोलिसांना चौकशीत सहकार्य न करता ओळखीच्या व्यक्तींचे वशिले सांगण्याला सुरवात केली. यावरून चंदनशिवे यांच्यासोबत त्यांनी वाद घातला. त्यामुळे सानपाडा पोलीस ठाण्याचे कर्मचारी अरुण वाडेकर हे देखील त्याठिकाणी आले.काही केल्या पोलीस सोडत नसल्यामुळे त्या तिघांनी अखेरीस बंदोबस्तावरील पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याला सुरवात केली. याचवेळी त्याठिकाणावरून चाललेल्या विशाल अगरवाल यांनी मोबाइलमधून या प्रकाराचे चित्रीकरण करण्याला सुरवात केली. त्याचा राग आल्यामुळे तिघा तरुणांनी त्यांनाही मारहाण केली. अखेर घटनास्थळी दाखल झालेल्या इतर पोलीस व नागरिकांनी त्या तिघांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्यावर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रजोत मोसमकर (२८), विशाल माने (२७), तेजस जगताप (२२) अशी त्यांची नावे असून प्रजोत व विशाल हे सानपाडाचे तर तेजस हा पनवेलचा राहणारा आहे. हे तिघेही वाशीत मद्यपान केल्यानंतर स्कुटीवरून (एमएच ४३ एव्ही ६१०५) सानपाडा येथे चालले होते. यादरम्यान मोराज चौकालगत नाकाबंदीत त्यांनी हा प्रकार केला. त्यांच्यावर शासकीय कामकाजात अडथळा, मद्यपान करून वाहन चालवणे तसेच ट्रिपल सीट दुचाकी चालवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे.