ठाणो : देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उद्या सत्तारूढ होणा:या मंत्रिमंडळात कुणाला स्थान लाभेल, याबाबतची उत्सुकता जिल्ह्यात शिगेला पोहोचली असून त्यावर पैजाही रंगू लागल्या आहेत. जिल्ह्यातून भाजपाचे सात आमदार विजयी झाले असून त्यात ज्येष्ठतेचा विचार केल्यास डोंबिवलीचे रवींद्र चव्हाण आणि ठाणो शहरचे संजय केळकर यांचा क्रमांक अग्रस्थानी आहे. त्यामुळे उद्या शपथविधी होणा:या मंत्रिमंडळात दोघांपैकी कोणाला स्थान मिळते, याची जशी चर्चा आहे, तशीच राष्ट्रवादीतून भाजपात आलेल्या फायर ब्रॅण्ड नेत्या व गणोश नाईकांना पराभूत करून जाएंट किलर ठरलेल्या मंदा म्हात्रे यांनाही संधी मिळण्याची शक्यता आहे.
ठाणो जिल्ह्यात एकूण 18 मतदारसंघ असून त्यापैकी ठाणो शहर- संजय केळकर, भिवंडी पश्चिम- महेश चौगुले, कल्याण पश्चिम- नरेंद्र पवार, मुरबाड- किसन कथोरे, डोंबिवली- रवींद्र चव्हाण, मीरा-भाईंदर- नरेंद्र मेहता, बेलापूर- मंदा म्हात्रे अशा सात मतदारसंघांत भाजपाचे आमदार निवडून आले आहेत. यापैकी चौगुले, पवार, मेहता हे पहिल्यांदाच आमदार झाले आहेत. कथोरे आणि मंदा म्हात्रे राष्ट्रवादीतून येऊन भाजपाचे आमदार झाले आहेत. त्यामुळे निष्ठा, अनुभव, कार्यक्षमता या तीनही निकषांवर केळकर आणि चव्हाण यांच्यातच चुरस आहे.
परंतु, ठाणो जिल्हा हा 18 आमदार निवडून देणारा आहे. त्यात पाच महापालिका आहेत आणि त्यांच्या निवडणुका लगेच होत आहेत. हे लक्षात घेऊन व त्यापाठोपाठ होणा:या सहकारी संस्थांच्या निवडणुका लक्षात घेऊन पक्षाचे बस्तान बसविण्यास प्राधान्य दिले गेले तर मंदा म्हात्रे यांचे पारडे जड ठरू शकते. केळकर हे ब्राrाण समाजाचे आहेत, तर चव्हाण हे मराठा समाजाचे आहेत.
जिल्ह्यात आगरी, कोळी,
ओबीसी या समाजांचे मतदार
अधिक असून त्यांना पक्षाशी जोडण्याला भाजपाने महत्त्व
दिले तर केळकर, चव्हाण यांच्यापैकी एक आणि मंदाताई अशी दोघांना
संधी मिळू शकते किंवा एकटय़ा मंदाताईंना पहिल्या लॉटमध्ये संधी मिळू शकते. परंतु, स्वपक्षाच्या आमदारांनाच प्राधान्य हा निकष लावला तर केळकर किंवा चव्हाण यातील एकाला संधी मिळू शकते. विशेष प्रतिनिधी)
4केळकर आधी विधान परिषदेचे आमदार होते. विधानसभेचे आमदार ते प्रथमच झाले आहेत. रवींद्र चव्हाण दुस:यांदा विधानसभेचे आमदार झाले आहेत. केळकर यांनी रवींद्र फाटक यांच्यासारख्या तगडय़ा उमेदवाराचा पराभव केला आहे. हे लक्षात घेता या दोघांपैकी नेमकी कोणाला संधी द्यावी, ही श्रेष्ठींसाठी डोकेदुखी ठरली आहे.